गोष्ट पूर्ण करा एक शिकारी-चिमणयांना पकडण्यासाठी जाळे- खूप चिमण्या जाळ्यात अडकणे-सुटकेसाठी धडपड-सर्वण चितेत -हुशार चिमणी- सल्ला- सगळयांनी एकदम उडावे- सर्व चिमणया जाळयासहित उडून जातात- उंदीर मित्रांकडून जाळे कुरतडणे- सुखरुप सुटका please write story fast and quick with moral also who will answer correct I will mark him/ her brainliest and this is marathi
Answers
★ कथालेखन :
एकीचे बळ
एक जंगल होते. त्या जंगलामध्ये सर्व प्राणी गुण्यागोविंदाने राहत होते. एकमेकांच्या अडीअडचणीला मदत करत असत. कुणा एखाद्यावर काही संकट आल्यास कशाचीही पर्वा न करता मदतीस हजर होत असे.
रोजच्याप्रमाणे चिमण्या आपले अन्न शोधण्यासाठी जंगलामध्ये फिरत होत्या.
परंतु त्या चिमण्यांना थोडीशीही कल्पना आली नाही की शिकाऱ्याने त्यांना पकडण्यासाठी जाळे टाकून ठेवलेले आहे.
चिमण्या त्या जाळ्यामध्ये अडकल्या. चिमण्यांना जाणवले की आता आपली सुटका नाही. त्या जीवाच्या आकांताने त्या जाळ्यामधून सुटण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. सर्व जणांना एकच चिंता लागू लागली आता शिकारी येईल आणि आपल्याला पकडून नेईल.
या सर्व चिमण्या मध्ये एक हुशार चिमणी होती. तिला सहज एक कल्पना सुचली आली आणि तिने बोलून दाखविली आपण एक - एकटीने प्रयत्न करून बघितला पण सर्व प्रयत्न निष्फळ झाले यापेक्षा आपण एक साथ सारे उडण्याचा प्रयत्न करू. त्याप्रमाणे सर्वांनी एक साथ उडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जाळ्या सहित उडता आले .
सर्व चिमण्या जाळ्यात सहित उडून दुसऱ्या जागी गेल्या. आणि त्यांनी मदतीसाठी याचना केली तेथे जवळच असलेले त्यांचे मित्र उंदीर यांनी ते जाळी कुरतडून काढले आणि चिमण्यांना मुक्त केले.
तात्पर्य : एकजुटीने कोणतेही काम केल्यास सहज व सुलभ होते. अशक्य असलेले काम शक्य होते.