India Languages, asked by narendradhore4, 18 days ago

गौतम बुद्धाचे चार महाभूते कोणती.


थोडक्यात लिहा


do not spam ​

Answers

Answered by aqmarahmad11
1

Answer:

मुख्य मेनू उघडा

मराठी विकिपीडिया

शोधा

गौतम बुद्ध

भारतीय तत्त्वज्ञ, सुधारक व बौद्ध धम्माचे संस्थापक

इतर भाषांत वाचा

Download PDF

पहारा

संपादन करा

विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.

बुद्ध (इ.स.पू. ६२३/ ५६३ – इ.स.पू. ५४३/ इ.स.पू. ४८३[३][४]) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमूनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत.[५] शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला.[५] या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इ.स.पू. ५४७ मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.[६] हिंदू धर्मातील मान्यतेनुसार बुद्धांना विष्णूच्या दशावतारातील नववा अवतार मानले जाते, तथापि बौद्ध धर्मात यास खोडसाळपणाचे समजले जाते.

बुद्ध

Buddha in Sarnath Museum (Dhammajak Mutra).jpg

जन्म

सिद्धार्थ

इ.स.पू. ६२३/ ५६३[१]

लुंबिनी, नेपाळ

मृत्यू

इ.स.पू. ५४३/ इ.स.पू. ४८३[२]

कुशीनगर, उत्तर प्रदेश, भारत

राष्ट्रीयत्व

भारतीय

टोपणनावे

गौतम, शाक्यमुनी

प्रसिद्ध कामे

बौद्ध धर्माचे संस्थापक

मूळ गाव

कपिलवस्तु

धर्म

बौद्ध धर्म

जोडीदार

यशोधरा

अपत्ये

राहुल

वडील

राजा शुद्धोधन

आई

महाराणी महामाया

नातेवाईक

महाप्रजापती गौतमी (मावशी व सावत्र आई)

जगातील सर्वात महान व्यक्तिमत्व

जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती

जगभरात १ अब्ज ८० कोटी अनुयायी

"बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (धर्माला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध धर्म' किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध भिक्खू - भिक्खूनींचा आणि दुसरा — बौद्ध उपासक - उपासिकांचा. बौद्ध धर्माच्या अनुयायांना "बौद्ध" किंवा "बुद्धिस्ट" म्हणतात.[७]

सर्व खंडांतील देशांमध्ये बौद्ध अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्धधर्मीय आहे. इ.स. २०१० मध्ये, जगभरातील बौद्ध अनुयायांची लोकसंख्या १८० कोटी ते २१० कोटी इतकी होती.[८][९][१०] अनुयायांच्या तुलनेत येशू ख्रिस्तानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी तथागत बुद्धांना (१.८ अब्ज) लाभलेले आहे. तसेच भारतातील कोट्यवधी दलित व हिंदू धर्मीयांनी आणि जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी गौतम बुद्धांचे अनुयायित्व पत्करले आहे. या सर्व बुद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. म्हणजेच तथागत बुद्ध जगात सर्वाधिक अनुयायी (२.३ अब्ज) असलेले सर्वाधिक प्रभावशाली धर्म संस्थापक, तत्त्वज्ञ आहेत.

मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथम स्थानी आहेत. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.

शाक्यमुनी (शाक्यांचा मुनी) - हे गौतमाचेच दुसरे नाव- हा बौद्ध धर्माचा मुख्य स्तंभ.[७] त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली. गौतम बुद्धांचे सर्व तत्वज्ञान हे पाली भाषेमध्ये मांडले गेले आहे. स्त्री पथकाच्या माध्यमातून या तत्त्वज्ञानाची माहिती मिळते. भारत हे बौद्ध धर्माची मूळ भूमी असले तरी भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार घडून आला. आजही अनेक देशांमध्ये बौद्ध धर्म हा खूप चांगल्या स्थितीमध्ये असलेला पाहायला मिळतो. मात्र भारत ही बौद्ध धर्माची मूळ भूमी असतानाही या भूमीपासून काहीसा तो दुरावलेला दिसतो. म्यानमार, कंबोडिया व श्रीलंका या देशांमध्ये या धर्माचा खूप मोठा प्रभाव आजही कायम असलेला दिसून येतो.

जन्म

प्रारंभिक जीवन

विवाह

गृहत्याग आणि तपस्या

ज्ञानप्राप्ती

धम्मचक्र प्रवर्तन

महापरिनिर्वाण

बौद्ध धर्म

शिकवण

दहा पारमिता

पंचशील

बुद्धांचा समाज जीवनावरील प्रभाव

बुद्ध संस्कृती

बौद्ध साहित्य

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

शेवटचा बदल ३ महिन्यां पूर्वी QueerEcofeminist कडून

मराठी विकिपीडिया

इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC

Similar questions