Hindi, asked by sumitchavan754, 1 year ago

२) गावाकडचे खेळ व आधुनिक खेळ यांच्या बदललेल्या स्वरूपाबाबत मित्रांशी चर्चा करा​

Answers

Answered by Anonymous
73

Answer:

मनोरंजन वा शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही क्रीडा. खेळण्याची प्रवृत्ती ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. लहान बालकापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच खेळांची आवड असते. अगदी प्राथमिक अवस्थेतील मानवसमाजातही अनेक प्रकारचे खेळ खेळले जात. शिकार, कुस्ती, द्वंद्वे, कवड्या, सोंगट्या, फासे इ. खेळ ते खेळत. प्राचीन ग्रीक लोक अनेक प्रकारचे खेळ खेळत. खेळांना नियमित व सुसंघटित असे स्वरूप ग्रीक लोकांनीच दिले. त्यांच्या जीवनात खेळांना फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. ग्रीक लोकांच्या वैभवकालात त्यांचे ऑलिंपिक, नेमियन, पायथियन, इस्थमियन इ. नियतकालीन सामने प्रसिद्ध होते. या सामन्यांत भाग घेणे व विजय मिळविणे हे मानाचे समजले जाई. या सामन्यांत धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टीयुद्ध इ. खेळांचा समावेश असे. रोमन लोकांतही खेळांना प्राधान्य होते.

आपल्या भारतात प्राचीन वैदिक कालात, तसेच रामायण व महाभारत कालात द्युत, फासे, कुस्ती, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती इ. खेळ प्रचलित होते. भारताप्रमाणे ईजिप्त, चीन, जपान इ. देशांतही सोंगट्या, गंजीफा, बुद्धिबळे, शतरंज यांसारखे खेळ फार पुरातनकाळापासून रूढ होते.

खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा व चिंता विसरावयास लावून मनाला विरंगुळा देण्याचे तसेच शरीर व मन ताजेतवाने करण्याचे काम विविध खेळ करू शकतात. शारीरिक श्रमांच्या खेळांत शरीरास भरपूर व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शरीर काटक व बळकट बनते. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडू वृत्ती इ. गुणांचीही वाढ होते. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना व नेतृत्वगुण यांना वाव मिळतो आणि या गुणांचा जीवनात विविध प्रसंगी उपयोग होतो. खेळातील चढाओढीमुळे खेळांचा दर्जाही वाढतो. राष्ट्राराष्ट्रांतील क्रीडास्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय सामंजस्यही वाढीस लागते.

खेळांचे निरनिराळ्या दृष्टीकोनांतून अनेक प्रकार पडतात. खेळांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन सामान्यतः त्यांचे बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रमुख प्रकार पडतात. बैठे खेळ म्हणजे घरात बसून खेळले जाणारे खेळ. उदा., पत्त्यांचे खेळ, बुद्धिबळे, गंजीफा, सोंगट्या, फाशांचे खेळ, कॅरम इत्यादी. मैदानी खेळांतही छोटे मैदानी खेळ व मोठे मैदानी खेळ असे प्रकार असतात. छोट्या मैदाना खेळांना (कोर्ट गेम्स) छोटी बंदिस्त जागा व आखलेली क्रीडांगणे लागतात. या प्रकारात बॅडमिंटन, टेबल टेनिस, रिंग टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे विदेशी खेळ येतात; तर खोखो, कबड्डी, आट्यापाट्या, लंगडी इ. देशी खेळ येतात. दुसऱ्या प्रकारच्या मैदानी खेळांना मोठी मैदाने लागतात. त्यांत क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, पोलो, बेसबॉल, गोल्फ इ. विदेशी खेळ मोडतात. यांशिवाय क्षेत्रीय शर्यतींचे खेळ असतात. त्यांत धावण्याचे (१०० मी., २०० मी. ते मॅरॅथॉन शर्यतीपर्यंत), फेकण्याचे (गोळाफेक, थाळीफेक इ.), उड्यांचे (लांब उडी, उंच उडी इ.) सर्व प्रकार आणि सर्व प्रकारच्या अडथळ्यांच्या शर्यती (हर्डल्स) यांचा समावेश होतो.२

Answered by tushargupta0691
12

उत्तर:

मुलांना खेळ खेळायला मजा येते. पारंपारिक आणि आधुनिक असे अनेक खेळ मुलांच्या मोटर विकासास मदत करू शकतात. दोन्ही गेमचे फायदे आहेत, परंतु त्यांच्या ऍप्लिकेशन्समध्ये तोटे देखील आहेत. पारंपारिक खेळ मुलांना त्यांची एकूण मोटर कौशल्ये सुधारण्यास मदत करू शकतात, तर आधुनिक खेळ त्यांना त्यांची उत्तम मोटर कौशल्ये सुधारण्यास मदत करू शकतात.

स्पष्टीकरण:

  • पारंपारिक खेळ हे लहान मुलांचे खेळ आहेत जे प्रादेशिक भिन्नतेसह वंशपरंपरागत संस्कृती बनतात. प्रत्येक प्रदेशातील पारंपारिक खेळांना फक्त वेगवेगळी नावे असतात; मुलांचे पारंपारिक खेळ हे सांस्कृतिक घटक आहेत कारण ते मुलांच्या मानसिक विकासावर, निसर्गावर आणि सामाजिक जीवनावर प्रभाव टाकू शकतात.
  • पारंपारिक खेळ मुलांच्या जीवनात नैतिक मूल्ये देखील वाढवू शकतात, जसे की प्रामाणिक असणे, एकत्र काम करण्यास सक्षम असणे आणि मुलांचा संयम बाळगणे.

त्यामुळे हे उत्तर आहे.

#SPJ2

Similar questions