गोविंदराव हायस्कूल आयोजित
४० वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन
पारितोषिक वितरण समारंभ
: प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक :
भूजल तज्ज्ञ डॉ. राजेन्द्र सिंह
: स्थळ :
: दिनांक :
गोविंदराठ हायस्कूल पटांगण
२९ जानेवारी २०२०
इचलकरंजी - ४१६ ११५,
वेळ : दुपारी ३ ते ६
जि. कोल्हापूर
मित्र मैत्रीण या नात्याने
विदयार्थी प्रतिनिधी या नात्याने
सदर समारंभास उपस्थित राहण्यासाठी
विनंती करणारे पत्र शाळेच्या विश्वस्तांना
.लिहा.
किंवा
विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक
मिळाल्याबद्दल तुमच्या मित्राचे/मैत्रिणीचे
अभिनंदन करणारे पत्र लिहा.
Answers
Answer:
दिनांक- १२ जानेवारी २०२२
प्रति,
अ.ब.क.
सरस्वती महाविद्यालय
मलाड पश्चिम-४०००९५
प्रिय मित्र अ.ब.क.
सप्रेम नमस्कार,
आज सकाळी पेपर वाचत असताना अचानक एक महत्त्वाच्या बातमी कडे लक्ष गेले आणि वाचून खूप मनापासून आनंद झाला. आणि ती बातमी होती तुझ्या यशाबद्दल, तुला मिळालेल्या विज्ञान प्रदर्शनातील प्रथम पारितोषाबद्दल. लहानपणा पासून तुझी विज्ञानाबद्दल असणारी आवड मी बघत होतो. आणि मला माहीत होतं की ही आवडच तुला एक दिवस ओळख निर्माण करून देईल.
मित्रा खरच तुझे खूप खूप मनापासून अभिनंदन. अशीच प्रगती करत रहा आणि नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्याची तुझी सवय सतत तुला नव्या यशाकडे घेऊन जाईल याची मला खात्री आहे.
काका आणि काकूंना माझा सप्रेम नमस्कार. येणाऱ्या सुट्टीत आपण लवकरच भेटू.
तुझा मित्र,
अभिजीत पाटील
Explanation:
Explanation:
आजुन काही मदत करू शकते ....