*गणिती कोडे*
एकदा एका आजीबाई कडे तीन साधू येतात.आजीबाई साधूंना जेवणासाठी काही लाडू बनविते.
तीन्ही साधूंना जेवणासाठी रांगेत बसवून लाडूंची टोपली हातात घेऊन पहिल्या साधूंना वाढायला जाते.आजीबाईच्या हातात लाडूंची टोपली पाहून साधू खूष होतात व लाडूंकडे पाहून म्हणतात *"दुप्पट हो"* लगेच आजीबाईच्या हातातील टोपलीतले लाडू *दुप्पट* होतात.
त्यातले काही लाडू आजीबाई पहिल्या साधूंना वाढते. उर्वरित लाडूंची टोपली घेऊन आजीबाई दुस-या साधूंना वाढायला जाते.आजीबाईच्या हातात लाडूंची टोपली पाहून साधू खूष होतात व लाडूंकडे पाहून म्हणतात *"तीप्पट हो"* लगेच आजीबाईच्या हातातील टोपलीतले लाडू *तीप्पट* होतात.
त्यातले पहिल्या साधूंना वाढले तेवढेच लाडू आजीबाई दुस-या साधूंना वाढते. उर्वरित लाडूंची टोपली घेऊन आजीबाई तीस-या साधूंकडे जाते. आजीबाईच्या हातात लाडूंची टोपली पाहून साधू खूष होतात व लाडूंकडे पाहून म्हणतात *चौप्पट हो"* लगेच आजीबाईच्या हातातील टोपलीतले लाडू *चौप्पट* होतात व आजीबाई टोपलीतले सर्व लाडू तीस-या साधूंना वाढते.
*आजीबाई तीन्ही साधूंना समान लाडू वाढते तर आजीबाईंनी साधूंसाठी किती लाडू बनविले व प्रत्येक साधूंना किती लाडू वाढले?*
*BEST OF LUCK*
Answers
Answered by
2
Answer:
आजीबाईंनी प्रथम 17 लाडू बनवले. प्रत्येक साधूला 24 लाडू दिले गेले.
Step-by-step explanation:
17 _____ 34 _____ (34-24=10)
10 _____ 30 _____ (30-24=6)
6 _____ 24 _____ (24-24=0)
पण खरं सांगायचं झालं तर याची अनेक infinite उत्तरे निघतील.
मी जे कॅल्क्युलेशन केले आहे ते त्यापैकी एक उत्तर म्हणून आपण म्हणू शकतो
17 आणि 24 हा त्या उत्तराचा ratio आहे
Attachments:
Similar questions