India Languages, asked by anna31, 1 year ago

ganesh chaturthi very short essay in marathi

Answers

Answered by NaneetMander
497
गणेशोत्सव गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. घराघरांत आणि सार्वजिनिक मंडळांत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा वआरती केली जाते. कोंकणामध्ये, आरतीच्या नंतर देवें म्हणतात. अन्यत्र आरतीनंतर गणपतीला नैवेद्य दाखवून प्रसाद वाटतात. अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेश मूर्तींचे तलाव, नद्या, समुद्र यात विसर्जन होते.गणेश चतुर्थीला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. हा गणेश उत्सव भारतात, महाराष्ट्र या शिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, ओरिसा आणि छत्तीसगडमध्ये तसेच, भारताबाहेरही ब्रिटन, अमेरिका, फिजी, सिंगापूर, नेपाळ, मलेशिया, कंबोडिया, कॅनडा, ब्रह्मदेश, आणि त्रिनिदाद व टोब्यागो या देशांमध्ये साजरा केला जातो. मुंबई आणि पुण्यात हा उत्सव मोठ्या प्रमाणात होयो. पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग आणि केसरी वाडा. या व्यतिरिक्त दगडूशेठ हलवाई, मंडई, बाबू गेनू आणि जिलब्या मारुती ही काही इतर मोठी मंडळे आहेत. पुण्यात हिरा बाग मंडळ हे भव्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुंबई मध्ये लालबागचा राजा हा सर्व गणपतींत मोठा मानलेला गणपती आहे.

NaneetMander: mark as brainliest , if helpful
Answered by Anonymous
297
"गणेश चतुर्थी"

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे, गणेश चतुर्थी. या दिवशी जिकडे तिकडे गणेशाची मूर्ती आणण्याची धमाल उडालेली असते. गणेशाची मूर्ती वाजत गाजत आणून सजवलेल्या मखरात बसवतात. त्याची यथासांग पूजा करतात. भक्तिभावाने गणपतीला दुर्वा वाहतात व मोदकांचा नैवेद्य दाखवतात. या दिवसापासून गणेशोत्सवास सुरुवात होते. हा गणेशोत्सव मुख्यतः महाराष्ट्रात साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे.

गणपती हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध दैवत आहे. संकटांचा नाश करणारे, सुख देणारे महान दैवत आहे. गणपती ही विद्येची देवता आहे. म्हणून लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मोठ्या भक्तिभावाने व आनंदाने गणपतीची पूजा करतात. घरोघरी गणपतीची आरती होते.

काही लोक गणपतीचे विसर्जन दीड दिवसाने, काही गाैरीबरोबर पाच दिवसांनी, तर काही सात दिवसांनी करतात. सार्वजनिक गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात.

गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी 'श्रीं' ची वाजत गाजत मिरवणूक काढतात. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणत लोक ढोल, ताशे वाजवून लेझीम खेळत-खेळत, नाचत जातात. समुद्र, नदी किंवा तलाव यांत गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करतात.

गणेशोत्सव हा एक अत्यंत आनंदमय उत्सव आहे. गणेशाेत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे भक्तिभाव निर्माण होतो, करमणूक होते. सामाजिक एकोपा वाढतो. ज्ञान वाढते.
Similar questions