India Languages, asked by payal7442, 11 months ago

गप्पा मारणे वाक्यात उपयोग​

Answers

Answered by rajraaz85
1

Answer:

गप्पा मारणे म्हणजे कुठल्याही नियमांचे पालन न करता दिलखुलास बोलत राहणे.

Explanation:

वाक्यात उपयोग-

१. राम आपल्या मित्राकडे जाऊन गप्पा मारत बसला.

२. काही व्यक्ती कामाचे बंधन न पाळता गप्पा मारत बसतात.

३. दोन मित्र खूप दिवसांनी भेटल्यावर मनसोक्त गप्पा मारतात.

४. मुलांनी आपल्या आई-वडिलांसोबत गप्पा मारल्या पाहिजे.

५. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी शाळेबाहेर गप्पा मारत बसले.

वरील वाक्यांवरून असे समजते की, गप्पा मारणे म्हणजे कुठल्याही नियमांचे पालन न करता आलेल्या कोणत्याही विषयावरती चर्चा करणे.

गप्पा करत असताना त्यात बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या खऱ्याच असतील असे नाही. कारण त्या करत असतांना बोलणाऱ्या व्यक्तीवर कुठलीही बंधने नसतात. किंवा त्या गोष्टी त्याला सिद्ध  कराव्या लागत नाही.

Similar questions