India Languages, asked by vinaya2545, 1 year ago

गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा

Answers

Answered by AadilAhluwalia
193

लेखिकेचे मत मला पटलेले नाही. मायबोलीच्या गर्व सगळ्यांनाच असतो, पण ह्याचा अर्थ हा नाही की आपण दुसऱ्या भाषेतील शब्द वापरू शकत नाही. आपल्या बोलण्यातून ते आपोआप होता. नेहमी वापरात येणाऱ्या शब्दांबाबत असा होतं. काही शब्द असे असतात की त्यांचे मराठी शब्द आपल्या माहित सुद्धा नसतं.

उदारणार्थ- आपण पंख्याला नेहमी फॅन म्हणतो. त्या शब्दची आपल्याला सवय झाली आहे.

Answered by lokhandeaasra
9

Explanation:

परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत, ते केव्हाच मराठी झाले आहेत. ते मराठी शब्द नाहीत, अशी कोणाला शंकाही येणार नाही.

मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात. आणि तेसुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ, समर्पक शब्द असताना अलीकडे "ती पिवळीवाली दया, " तो पाढरावाला पट्टा दाखवा" अशी वाक्ये सरांस ऐक येतात. वास्तविक पाहता 'पिवळी बॅग' आणि 'पिवळीवाली बॅग यांत कोणता फरक आहे? 'पिवळी बॅग' या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळीवाली' हा नवीन शब्दप्रयोग का करावा ? मराठीत आपण असे बोलतच नाही. मराठीत 'वाला' हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो. 'पिवळी' हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला 'वाला' हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही, म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये, हे लेखिकांचे मत योग्यच आहे.

Similar questions