Geography, asked by komalmali476, 3 months ago

गट पर्वत कसे निर्माण होतात आकृतीसह स्पष्ट करा​

Answers

Answered by BubblySnowFake
5

Answer:

सभोवतीच्या प्रदेशापासून सापेक्षतः बराच उंचावलेला आणि माथ्याशी थोडीशीच जागा असलेला भूभाग. सामान्यतः याची उंची पायथ्यापासून १,००० मी. पेक्षा अधिक असावी असा संकेत असला, तरी केवळ उंची हाच पर्वताचा निकष नाही. तिबेट आणि बोलिव्हिया हे पठारी प्रदेश, तसेच उत्तर अमेरिकेतील प्रचंड मैदाने यांची समुद्रसपाटीपासूनची उंची इतर भागातील कित्येक पर्वतांपेक्षा जास्त आहे. माथ्याकडे निमुळती होत जाणारी जागा हे पर्वतांचे पठारांहून वेगळेपणा दाखवणारे आवश्यक वैशिष्ट्य आहे. एकाकी, सुटे पर्वत क्वचित आढळत असले, तरी सामान्यतः पर्वतांच्या सलग रांगा आणि श्रेणी असतात. पर्वतमाथ्याच्या निमुळत्या भागाला शिखर म्हणतात. दोन किंवा अधिक शिखरे जोडणाऱ्‍या लांबट भागाला कटक आणि अशा अनेक सलग कटकांना डोंगररांगा म्हणतात. सामान्यतः पर्वताहून लहान उंचवट्याला डोंगर आणि डोंगराहून लहान उंचवट्याला टेकडी म्हणतात. अनेक डोंगर व पर्वत एकमेकांना जोडलेले असले म्हणजे ती पर्वतश्रेणी होते. सामान्यतः एकमेकींना समांतर असलेल्या अनेक पर्वतश्रेणींची मिळून पर्वतसंहती होते. एका संहतीमधील पर्वतश्रेणी त्यांच्या रचना, निर्मिती प्रक्रिया इ. दृष्टींनी परस्परांशी निकट संबंधित असतात. अनेक पर्वतसंहतीच्या समुदायाला पर्वतसमूह म्हणतात. एका समूहातील निरनिराळ्या पर्वतसंहतींचा निर्मितीच्या प्रक्रियांच्या दृष्टीने संबंध असतोच असे नाही.

Answered by attarkaif267
0

Explanation:

गट पर्वत कैसे निर्माण होता

Similar questions