Geography, asked by premshardul891, 3 months ago

गट पर्वत म्हणजे काय​

Answers

Answered by riddhi87
0

Answer:

विभंग-गट (ठोकळ्या) पर्वत : कित्येक मोठे पर्वत विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेले आहेत. विभंग प्रतल तिरपे असल्यास वर सरकणारे खडकांचे गटही तिरपे झालेले असतात. कॅलिफोर्नियातील सिएरा नेव्हाडाच्या पर्वतरांगा ६५० किमी. लांबीच्या आणि ८० ते १२० किमी. रुंदीच्या, तिरप्या झालेल्या. विभंग ठोकळ्यापासून निर्माण झालेल्या आहेत. या ठोकळ्याची पूर्व बाजू उंचावली जाऊन त्याचा माथा समुद्रसपाटीपेक्षा ४,००० मी. उंच गेला आहे. हा ठोकळा मुख्यतः या प्रदेशात पूर्वी अंतर्वेशित झालेल्या ग्रॅनाइटाचा बनलेला असला, तरी मूळच्या सिएरा नेव्हाडाच्या पर्वत रांगा ज्या भूद्रोणीतील गाळांच्या वलीकरणाने तयार झाल्या, त्या थरांचे अवशेषही त्याच्यात दिसून येतात.

कधीकधी कवचातील जवळजवळच्या ठिकाणी दोन समांतर विभंग निर्माण होऊन दोन्ही विभंग-प्रतलांमधला भाग वर उचलला जातो किंवा खाली दडपला जातो वा खचतो. मधला भाग वर उचलला जातो किंवा खाली दडपला जातो वा खचतो. मधला भाग वर येऊन तयार झालेल्या लांबट कटकाला ठोकळ्या पर्वत आणि मधला भाग खाली खचला असल्यास त्या भागास ⇨खचदरी म्हणतात.

आफ्रिका व आशिया मायनर येथील खचदऱ्‍या व त्यांच्या दोन्ही काठांवरचे डोंगर, यूरोपातील ऱ्‍हाइन नदीची खचदरी व तिच्या काठचे ब्लॅकफॉरेस्ट व व्होजेस हे डोंगर प्रसिद्ध आहेत. ॲपालॅचिअन हेही मूळचे वलित पर्वत असले, तरी त्यांची सध्या उंची, मूळचे उंचावलेले भाग झिजल्यानंतर घडून आलेल्या विभंगांमुळे ते भाग पुन्हा उंचावले गेल्यामुळे प्राप्त झालेली आहे. मात्र ॲपालॅचिअन हे ठोकळ्या पर्वतांचे उदाहरण नाही.

Similar questions