India Languages, asked by nuzha88, 3 months ago

गदय आकलन:
देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्यात देशसेवकांना समाधान मिळते. स्वातंत्र्य प्रेम, अन्यायाविरुद्ध
चीड, स्वाभिमान, लोकहिताची कळकळ वगैरे गुण त्यांच्या ठिकाणी असतात; म्हणून देशसेवा करताना
त्यांना कोणत्याही संकटाची पर्वा वाटत नाही. तुरुंग हे त्यांना राजवाड्याप्रमाणे वाटतात आणि
हातपायातील बेड्या या फुलांच्या हाराप्रमाणे गोळीबाराच्यावेळी बंदुकीच्या गोळ्यांचा अन्य शस्त्रांच्या
जखमा ज्या क्रांतिकारकांच्या अंगावर आहेत, त्या त्यांना आभूषणे वाटतात. स्पष्टवक्तेपणा, धडाडी
आणि उत्कट देशप्रेम यामुळे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित नेहरु, सुभाषचंद्र बोस वगैरे सर्वच
देशसेवक आजही आपल्याला आदरणीय वाटतात.
प्र५) इ) वरील उतारा वाचून त्यावर पाच प्रश्न तयार
करा.​

Answers

Answered by borhaderamchandra
2

Answer:

1 देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्यात देशसेवकांना काय मिळते?

2 कोणते गुण देशसेवकांच्या ठिकाणी असतात?

3 देशसेवकांना तुरुंग कशाप्रमाणे वाटतो?

4 क्रांतिकारकांना जखमा काय वाटतात?

5 आपणास माहीत असलेल्या दोन देशसेवकांची नावे लिहा

Similar questions