History, asked by jagrutipawar966, 5 months ago

घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार यातील फरक स्पष्ट करा.​

Answers

Answered by muskan2822
28

Answer:

व्यापार, किरकोळ व घाऊक : उपभाक्त्यांना नित्य गरजेचा माल अल्प प्रमाणात विकण्याची प्रक्रिया म्हणजे किरकोळ व्यापार आणि हे कार्य करणारा म्हणजे किरकोळ व्यापारी. उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणावर माल गोळा करण्याचे, तो साठविण्याचे आणि लहान व्यापाऱ्यांना पुरविण्याचे कार्य म्हणजे घाऊक (ठोक) व्यापार आणि तो करणारा घाऊक व्यापारी. किरकोळ व्यापारी म्हणजे इंग्रजीतील ‘रिटेलर’. रिटेलरचा अर्थ लहान तुकडे वा भाग करणे, असा असून तो मोठा अर्थपूर्ण आहे.

किरकोळ व्यापार व त्याचे प्रकार : किरकोळ विक्रेत्याला वा व्यापाऱ्याला किमतीतील संभाव्य चढउतार, उपभोक्त्यांच्या आवडीनिवडींतील संभाव्य बदल, मालाच्या दर्जातील संभाव्य बिघाड यांसारखे व्यापार उदिमांतील अटळ धोके पत्करावे लागतात. ग्राहकाची आवडनिवड लक्षात घेऊन तिची उत्पादकांना जाणीव करून देणे व मालाच्या मागणी-पुरवठ्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करणे, हे किरकोळ व्यापाऱ्याचे काम असते. उत्पादन-मागणी यांत समन्वय घडवून आणणारा बाजार-व्यवसायातील अत्यावश्यक घटक म्हणजे किरकोळ विक्रेता. जरूरीप्रमाणे गिऱ्हाईकाला उधारीवर माल देण्याची तयारी त्याला ठेवावी लागते.

किरकोळ व्यापाऱ्याची स्थूलमानाने फिरते दुकानदार व बैठे दुकानदार, अशी किरकोळ व्यापाऱ्याची स्थूलमानाने वर्गवारी करता येईल. कोणत्याही एका ठिकाणी दुकान न घालता गल्लोगल्ली व गावोगावी आपला माल खपविणारे हातगाडीवाले आणि फेरीवाले पूर्वीपासून सर्वत्र आढळतात. गावांत आणि शहरांत बैठे दुकानदार विशेषत्वाने आढळतात. या बैठ्या दुकानांची अनेक प्रकारे विभागणी करता येते. विक्रीचा माल, दुकानाची मालकी, अंतर्गत व्यवस्था इत्यादींवरून किरकोळ दुकानांची वर्गवारी करता येते. मर्यादित भांडवलाची सर्वसामान्य दुकाने आणि भांडवलप्रधान अशी बहुविभागीय दुकाने, ⇨ सुपर बाजार व ⇨ साखळी दुकाने अशीही वर्गवारी करता येते. याव्यतिरिक्त सहकारी ग्राहक संस्था, कराराने बांधलेली दुकाने, साठा न करणारे व्यापारी, ⇨ टपाल विक्री व्यवसाय व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे विक्री हे प्रकारही आढळतात.

सर्वसाधारण दुकाने ही सर्वांत जुनी किरकोळ विक्री संस्था असून, त्यांची मालकी एकाच व्यक्तीकडे असते. ही दुकाने ग्रामीण भागांत, छोट्या गावांत आणि शहरांच्या परिसरात ग्राहकांना सर्व प्रकारचा माल पुरवितात. या दुकानांना बेताचे भांडवल पुरते. दुकानदार ग्राहकांच्या गरजांनुसार वस्तूंची निवड करतो, त्यामुळे वस्तूंच्या विक्रीसाठी छोट्या दुकानांत क्वचित एकाच प्रकारचा अगर गटातील माल विकला जातो. किरकोळ दुकानाची मालकी एकाकडे असल्याने एकदा दुकानदार व्यवसायाच्या विविध अंगांवर जातीने लक्ष ठेवू शकतो. यासाठी तो आपल्या कुटुंबियांचीही मदत घेतो. मर्यादित भांडवल असल्याने स्वस्त भावात मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करणे त्याला शक्य नसते. किरकोळ दुकानदारांकडे मालाचा पुरेसा साठा नसतो आणि मर्यादित उलाढालीमुळे खरेदी-विक्रीचा हिशेब बारकाईने ठेवण्याचे त्यांना ज्ञान नसते. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय चालविणे, हेच बहुतेकांचे उद्दिष्ट असते. असे असले, तरी त्यांचे ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध व ग्राहकांच्या गरजांची चांगली ओळख त्यांना असते. वाहतुकीच्या साधनांत वाढ होऊनही सर्वसामान्य दुकाने मोठ्या दुकानांच्या स्पर्धेत अद्यापिही टिकून राहिली आहेत.

जेव्हा एकाच छपराखाली व व्यवस्थापनाखाली दुकानाचे अनेक विभाग पाडून प्रत्येक विभागातून विशिष्ट वस्तूंची विक्री केली जाते तेव्हा अशा दुकानाला एकछत्री दुकाने किंवा ⇨ विभागीय भांडारे असे म्हणतात. हे बहुविभागीय दुकान म्हणजे एक भव्य विक्रीकेंद्रच होय. टाचणीपासून मोटारीपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू या दुकानांत विकल्या जातात. ग्राहकांच्या क्रय-प्रेरणांना आवाहन करण्यासाठी वस्तु-दालने (शोकेस), वस्तूंची आकर्षक मांडणी, अत्याधुनिक फर्निचर, तत्पर सेवक व भव्य सजावट यांवर मोठा खर्च केला जातो. दूरध्वनीवरून मालाची मागणी स्वीकारली जाते. माल घरपोच करण्यासाठी दुकानाची गाडी असते. थोडक्यात, गिऱ्हाईकांच्या जास्तीत जास्त सुखसोयींकडे लक्ष पुरविण्यात येते. पाश्चिमात्य देशांत बहुविभागीय दुकाने अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. या दुकानांना मोठ्या प्रमाणावर भांडवल लागते. मालांच्या किमती वाजवीपेक्षा जास्त असल्याने छोटी गिऱ्हाईके या दुकानांकडे फारशी फिरकत नाहीत. धंद्याचा पसारा प्रचंड असल्याने मालक आणि ग्राहक यांच्यात जिव्हाळा निर्माण होणे अशक्य होते. अनेकदा व्यवसायाचा व्याप आटोक्याबाहेर जातो, माल पडून राहतो आणि व्यवस्थापनाला प्रचंड नुकसानही सोसावे लागते. वाढती स्पर्धा, मोठ्या प्रमाणावरील वाहतूक समस्या, मोटारगाड्या ठेवण्यासाठी अपुरे वाहनतळ, प्रदूषण यांमुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली एकछत्री दुकाने अनेक देशांमध्ये ग्राहकांना आकृष्ट करण्यात अपयशी ठरली आहेत. त्यामुळे अशा दुकानांनी आपल्या शाखा उपनगरांमध्ये उघडण्यास सुरुवात केली आहे. अनेक वस्तूंची विक्री एकाच ठिकाणी न करता केवळ विशिष्ट वस्तूंचीच विक्री शहरातील निरनिराळ्या भागांत करणाऱ्या दुकानांना बहुशाखा अगर साखळी दुकाने असे म्हणतात. जसजसे धंद्यात यश मिळत जाईल, तसतशा दुकानांच्या शाखा शहराच्या विविध भागांत उघडण्यात येतात. शहरभर विखुरलेल्या सर्व दुकानांवर मध्यवर्ती कार्यालयाचे नियंत्रण असते. स्वत: उत्पादक साखळी दुकाने सुरू करून ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध ठेवू शकतो. त्यामुळे मध्यस्थाचे उच्चाटन होते. अशा दुकानांतून भपक्यापेक्षा चांगल्या दर्जाचा नित्योपयोगी माल शहराच्या विविध भागांतील रहिवाशांना माफक किमतीत देण्यावर अधिक कटाक्ष असतो. ग्राहकांच्या तक्रारी असतील, तर मुख्य कचेरी तक्रारीचे निवारण करते. मात्र ग्राहकांना बहुविभागीय दुकानांत मिळतो, तसा विविध प्रकारचा वैविध्यपूर्ण माल येथे मिळत नाही. साखळी दुकाने चालविण्यासाठी कार्यक्षम नोकरवर्गाची गरज भासते. अन्यथा ही दुकाने ग्राहकांच्या सदिच्छा

Mark me brain least❤❤

Answered by pasarateritesh76
0

Answer:

१) उद्योग व वाणिज्य

२) फिरते किरकोळ व्यापारी व

Similar questions