Social Sciences, asked by nehajadhav8052, 3 months ago

घरांतीधील अंतरांच्या वस्तयांचे प्रकार सांगा​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

वस्ती : पारिस्थितिकी शास्त्राप्रमाणे ‘वस्ती’ ही सजीवांच्या निवासस्थळाचा बोध करून देणारी संज्ञा आहे. ती असे दर्शविते की, त्या ठिकाणी त्या विशिष्ट सजीवाला आवश्यक असणारे पर्यावरणीय घटक उपलब्ध आहेत व तो सजीव तेथे कायम अथवा तात्पुरता निवासी आहे. त्यामुळे ‘पृथ्वी ही सजीवांची वस्ती आहे’ हा संबोध त्या दृष्टीने अर्थपूर्ण ठरतो. विशिष्ट सजीवास विशिष्ट पर्यावरणीय घटकांची आवश्यकता असते. काही प्रमाणात उपलब्ध नैसर्गिक घटकांत सजीव आवश्यक ते फेरफार घडवून आणतो व ‘वस्ती’ निर्माण करतो. वस्तीमध्ये त्या सजीवाने नैसर्गिक घटकांत फेरफार करून उपकारक असे घटक निर्माण केलेले आढळतात. ‘वाघांची वस्ती’ असा शब्दप्रयोग केल्यास वाघांना जगण्यास आवश्यक घटक व वाघांचे तेथील वास्तव्य यांचा बोध होतो. सजीवाच्या स्वरूपाप्रमाणे ‘वस्ती’ ही संज्ञा व्यापक प्रदेश किंवा विशिष्ट छोटी जागा किंवा एखादा प्राणी दर्शविते.

Explanation:

मनुष्यवस्तीचे प्राकृतिक घटक :

सूर्यप्रकाश : सजीव सृष्टीचा मूलाधार सूर्यप्रकाश आहे. तो जीवाला आवश्यक ऊर्जा पुरवितो. ४० से.पेक्षा कमी तापमानात वृक्षवाढ थांबते. धान्यास अंकूर येत नाहीत, झाडास पाने येत नाहीत. शरीरास आवश्यक ती ऊर्जा निर्माण करण्याची किमान पातळी सूर्यप्रकाश व तापमान पुरवितात. उष्ण कटिबंधात वर्षभर भरपूर सूर्यप्रकाश व तापमान जास्त असते. ध्रुव प्रदेशांकडे त्यांचे प्रमाण घटत जाते. म्हणून उष्ण कटिबंधात सर्वांत प्रथम मनुष्यवस्त्या निर्माण झाल्या.

हवा : मनुष्यप्राण्यास जिवंत राहण्यासाठी हवेची, तीमधील ऑक्सिजनची आवश्यकता आहे. विरळ हवेत पुरेसा ऑक्सिजनपुरवठा होत नसल्याने त्या हवेत श्वास घेणे त्रासदायक होते. म्हणून ४,००० मी. पेक्षा जास्त उंच प्रदेशात मनुष्यवस्त्या फारशा आढळत नाहीत. तेथे असणाऱ्या मनुष्याच्या छातीचा आकार मोठ्या फुप्फुसामुळे मोठा आढळतो. पण २,५०० मी.पेक्षा कमी उंचीच्या कोणत्याही भागात भूतलावर हवेची कमतरता नाही. म्हणून हवा आवश्यक घटक असला, तरी तो अद्याप तरी वस्तीवर मर्यादा ठेवणारा घटक नाही. तीव्रवायुप्रदूषणामुळे शहरांच्या काही भागांत तो आज प्रतिकूल बनत आहे.

पाणी : पाणी हा घटक मनुष्यवस्तीला जास्त थेटपणे मर्यादित व नियंत्रित करणारा आहे. झरे, तलाव, नद्या, भूजल हे पाण्याचे स्त्रोत जेथे आहेत, तेथेच मनुष्यवस्ती स्थिरावते. पिण्याचे पाणी हा सर्व वस्त्यांचा निर्णायक घटक आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पिण्याचे पाणी वाढत्या वस्त्यांना वाढत्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्याशिवाय मनुष्यवस्ती स्थिर राहू शकत नाही.

अन्न : अन्नाची गरज सहज व सतत भागेल अशी स्थळे, पाणी उपलब्ध असल्यास मनुष्यवस्तीसाठी प्रथम निवडली जातात. पाणी असणारी, पण अन्नाचे दुर्भिक्ष असणारी अनेक स्थळे मनुष्यवस्तीरहित आहेत. पाण्याची गरज निर्णायक असली, तरी पाणी तुलनेने विपुल आहे. अन्न दुर्मिळ आहे, कारण लोकसंख्या जास्त आहे. अन्न हे कार्यशक्ती व शारीरिक विकास ह्यांकरिता आवश्यक आहे. वनोत्पादने गोळा करणे, फळझाडे लागवड, शेती, शिकार, पशुपालन, मासेमारी हे अन्नोत्पादनाचे मार्ग प्राचीन काळापासून आजतागायत मनुष्यवस्तीचे आधार ठरले आहेत. तंत्रज्ञान व वाहतूकविकास यांमुळे काही प्रमाणात वस्तीवरची स्थानिक अन्नाची बंधने मनुष्य शिथिल करू शकतो. वस्त्यांची स्थाने, त्यांचे वितरण, संख्या व आकार, अन्नाची आणि पाण्याची उपलब्धता तसेच प्रमाण दर्शवितात. मोठ्या वस्त्यांमध्ये नैसर्गिक अन्नाचे स्त्रोत पुरेसे नसतात म्हणून अन्नसाठे उभारावे लागतात तसेच अन्नपुरवठाप्रणाली विकसित करावी लागते.

मानववस्त्यांची कार्ये :  

(१) संरक्षण : मानव निवारा बांधतो. निवाऱ्यामुळे वस्ती निर्माण होते. मानवाला ऊन, थंडी, वारा, पाऊस आणि हिंस्त्र प्राणी व इतर आक्रमक मानवसमूह यांपासून संरक्षणाची गरज असते. ही गरज वस्ती भागविते. वस्तीमुळे मानवाला समूहशक्तीचे संरक्षण मिळते.

(२) विश्रांती : वस्ती मानवाला विश्रांतीचे, खाजगी जीवनासाठी स्थळ उपलब्ध करून देते.  

(३) संपत्तीची साठवण : मानवाची वैयक्तिक व सामूहिक संपत्ती साठविण्याची सोय वस्तीमुळे होते. धान्य, मौल्यवान वस्तू, शेतीसाधने व नंतरच्या काळात सोने-नाणे इ. संपत्तिरूप वस्तू वस्तीमुळे साठविता येतात. त्या गरज असेल तेव्हा वापरता येतात.  

(४) सामाजिक-सांस्कृतिक कार्ये : वस्तीमुळेच मानवाला कार्यक्षम असे सामाजिक संघटन करता येते. कुटुंब, समुदाय व उत्पादक संघटन, श्रमांचे विभाजन, कार्याचे संयोजन वस्तीत निर्माण होते. सांस्कृतिक घटक, कला, धर्म यांची अभिव्यक्ती व विकास वस्तीशिवाय अशक्य आहे. वस्तीत मानवाला अंतर्मुख होण्यास निवांतपणा मिळतो. वस्तीच्या आधारे तो चिंतनशील बनतो. वस्त्यांची जशी वाढ होते, त्या प्रमाणात त्या वस्त्यांचे सामाजिक-सांस्कृतिक कार्य जास्त व्यापक व तरल होते. वरील कार्ये मूलभूत असून सूत्ररूपाने मांडली आहेत. आजच्या वस्त्यांची साधन-संपत्ती, निवासी सोयी, आर्थिक, राजकीय, व्यापारी, प्रशासकीय, शैक्षणिक, आरोग्यसेवा, मनोरंजनादी कार्ये वरील कार्यातूनच विकसित झाली आहेत.

Similar questions