Science, asked by tonny7651, 11 months ago

घरगुती पातळीवर शून्य कचरा प्रणाली अमलात आणण्याचे मार्ग शोधा

Answers

Answered by bestanswers
61

घरगुती पातळीवर शून्य कचरा प्रणाली अंमलात आणण्याचे मार्ग

शून्य कचरा ही  संकल्पना म्हणजे होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे. सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग बायोगॅस निर्मितीसाठी करणे अजैविक कचरा म्हणजे प्लॅस्टिक आणि टाकाऊ काच यांचा पुनर्वापर करणे.  

घरगुती पातळीवर या कचऱ्याची विभागणी खालीलप्रमाणे झाली तर त्याची विल्हेवाट लावणं आणखी सोपं होईल.  

  • ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करणे.  
  • सुक्या कचऱ्यात टाकाऊ कचरा वेगळा करणे आणि पुनर्वापरासाठीचा कचरा वेगळा करणे.  
  • ओला कचऱ्याचा घरीच खत म्हणून वापर करणे.  
  • घन कचऱ्याची निर्मिती होण्यापासून रोखणे. अतिरिक्त कपडे, वस्तू, इलेक्ट्रिक सामान खरेदी न करणे  
  • आपल्या सभोवताली कचरा होऊ नये याची दक्षता घेणे.

अशा पद्धतीने कचरा व्यवस्थापन घर पातळीवर योग्य प्रकारे झाले तर ही समस्या सोडवणे आणखी सोपे होईल.

Similar questions