gharyad che aatma vrutt essay in Marathi
Answers
Kr̥payā tē sōpē karā
■■ घड्याळाचे आत्मवृत्त■■
नमस्कार मित्रांनो! मी तुम्हाला वेळ दाखवणारा, तुमची मदत करणारा, तुमचा साथी घड्याळ बोलत आहे.आज मी तुम्हाला माझी जीवनकथा सांगणार आहे.
माझा जन्म एका कारखान्यात झाला हिता. तिथे माझ्यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे, रंगाचे व डिज़ाइनचे घड्याळ होते. तिथून आम्हाला एका दुकानात विकण्यासाठी आणले गेले.
माझ्या गुलाबी रंगाच्या चामडी पट्टयामुळे आणि सुंदर डिज़ाइनमुळे एके दिवशी एका मुलाने मला लगेच विकत घेतले. दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या मैत्रिणीला मला वाढदिवसाची भेट म्हणून दिले. मी तेव्हा खूप खुश होतो.
माझी मालकीणसुद्धा मला पाहून खूप खुश झाली. तिला सगळ्या भेटींमधून मी सगळ्यात जास्त आवडलो. तिने लगेच मला तिच्या मनगटावर घातले.
दुसऱ्या दिवशी शाळेत सुद्धा ती मला मनगटावर घालून गेली होती. तिच्या सगळ्या मैत्रिणींनी माझी स्तुती केली. सगळे काही सुरळत चालले होते. मी तिच्या खूप उपयोगी पडायचो. माझ्या अलार्ममुळे तिला अभ्यासात, सकाळी उठायला खूप मदत व्हायची. परिक्षेच्या वेळी सुद्धा मी तिला खूप मदत करायचो.
पण एके दिवशी मी तिच्या हातातून चूकून पाण्यात पडलो.माझ्यात पाणी घुसल्यामुळे मी बिघड़लो. तिने मला दुरुस्त करायला एका दुकानात नेले,पण मी काही दुरुस्त होऊ शकलो नाही. तेव्हा, माझ्या मालकिणीला खूप वाईट वाटले आणि मी सुद्धा खूप दुखी होतो.
माझा आता काही वापर होणार नाही,म्हणून तिच्या आईने मला कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिले. त्या दिवशी मी खूप रडत होतो.पण, माझ्या मालकिणीला मी मदत केली याचा मला समाधान वाटतो.
तर अशी होती माझी जीवनकथा.