giryarohan ake sahas Marathi essay answer fast
Answers
गिर्यारोहण एक साहस
गिर्यारोहण म्हणजे पर्वतावर अथवा उंच डोंगरावर चढून जाण्याचे शास्त्र किंवा कला. हा एक प्रकारचा अत्यंत साहसी आणि कठीण असा क्रीडाप्रकार म्हणता येईल. अखिल भारतीय क्रीडा मंडळ सुद्धा याकडे एक क्रीडाप्रकार म्हणून पाहतं. हा क्रीडाप्रकार आत्मसात करण्यासाठी कौशल्य, योग्य प्रशिक्षण आणि योग्य अशी साधनसामग्री गरजेची असते.
अगदी लहान उंचीच्या टेकडीपासून ते माउंट एवरेस्ट शिखर पार पडणे हे प्रकार गिर्यारोहणात येतात. साहसी वृत्ती, अज्ञात स्थळाचे संशोधन, निसर्गाशी जवळीक आणि धकाधकीच्या जीवनापासून दूर जाण्याची इच्छा माणसाला गिर्यरोहक बनवते.
अनेकदा निसर्गाच्या लहरींशी मिळतंजुळतं घेऊन गिर्यारोहकांना हा चित्तथरारक खेळ आपल्या सामर्थ्यावर आणि सहकाऱ्यांच्या मदतीने लीलया खेळावा लागतो.
बर्फ, पाऊस, निसरडे कडे, रणरणतं ऊन या सगळ्या संकटांशी सामना करत त्याला आपला मार्ग आक्रमावा लागतो.
Answer:
nice explanation but tell in sort