give information of the computer in Marathi
Answers
Explanation:
मानव हा विकसित प्राणी आहे. आणि त्याचा कडे विचार करण्याची शक्ती आहे. मानवाने सुरुवात पासूनच नेहमी हा विचार केला आहे कि, आपले श्रम कशा प्रकारे कमी करता येईल आणि आपली कार्यक्षमता कशा प्रकारे वाढविता येईल. मानवाने त्या संदर्भात त्याने अनेक उपकरणे सुद्धा शोधून काढलीत. उदा. हातोडी, चाकू, करवत, स्क्रू-ड्रॉयव्हर इ. यांचा उपयोग करून मानवाने आपल्या हाताची शक्ती वाढवली, आपली चालण्याची गती वाढवण्यासाठी मानवाने सायकल, कार, विमाने, रेल्वे, यांचा शोध लावला व आपली चालण्याची गती फार मोठ्या प्रमाणत वाढवली. तसेच प्राण्यांची शिकार जवळ जाऊन हाताने न करता तीर - कमान ने केल्यास ती जास्त सुरक्षित आणि लवकर होईल ह्या उद्देशाने तीर - कमानचा शोध लावून त्यांचा उपयोग करू लागला. गणितीय प्रक्रिया जलद करण्यासाठी मानवाने गणनयंत्रचा शोध लावला. परंतु मानवाला गणनयंत्रपेक्षा हि अतिजलद आणि बिनचूक करण्याकरिता यंत्राची आवश्यकता भासली आणि याच संकल्पनेतून संगणकाचा जन्म झाला. सुरुवातीला संगणक हे फक्त गणितीय किंवा आकडेमोड करणारेच यंत्र होते. पण दुसऱ्या महायुद्धानंतर संगणकाचा फार गतीने विकास झाला. आता २० व्या शतकात आधुनिक संगणक तयार करण्यात आले. आज जर कोणी संगणक!!!!! असा शब्द उच्चारला कि, आपल्या प्रत्येकांच्या डोळ्या समोर एक मॉनिटर, माऊस, कीबोर्ड, सी.पी.यु. असे चित्र उभे राहते.
या युगा मध्ये असा कोणताच व्यक्ती नसेल कि, ज्याने संगणक पाहिलेला नसेल. जरी कोणाला संगणक वापरता येत नसेल परंतु संगणक मात्र पहिलाच असेल. गेल्या दशकापासून संगणक आपल्या रोजच्या जीवनाचा इतका अत्यावश्यक भाग झाला आहे. जणू काही संगणका शिवाय जीवन सुद्धा अपुरे वाटायला लागले आहे. त्याला कारण पण तसेच आहे संगणकाची काम करण्याची अचूकता एक मुख्य कारण आहे आणि वेग सुद्धा. आज काल संगणकामुळे पैसे पाठविणे, बिल भरणे, शालेय फॉर्म भरणे, विविध योजनांचे फॉर्म भरणे, बँकेशी देवाण घेवाण चे व्यवहार करणे, इंटरनेट बँकिंग, इ-कॉमर्स , ऑनलाईन तिकीट बुक करणे, खरेदी करणे, जेवण मागविणे.... इत्यादी कामे आता घरबसल्या होत आहेत. म्हणून तर आजचे युग हे संगणकीय युग आहे. संगणक हा मानवाच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य असा भाग बनला आहे असे चित्र आपल्याला सर्वत्र दिसत आहे. मानव संगणकाकडे कच्ची माहिती पुरवितो. त्या माहितीचे अर्थ विश्लेषण करून त्यावर प्रक्रिया करून संगणक आपल्याला आवश्यक ती माहिती पुरवितो. आज आपण जे मोबाईल वापरतो तो पण एक प्रकारचा छोटा संगणकच आहे. आज क्षेत्र कोणतेही असो जसे कि,
उदानार्थ :-
· कारखाने
· औद्योगिक क्षेत्र
· विमा
· व्यापारी उद्योग
· सरकारी व खाजगी बँका
· सरकारी तथा खाजगी कार्यालये
· विज्ञान आणि तंत्रज्ञान
· कृषी विभाग
· शिक्षण क्षेत्र
· वैद्यकीयशास्त्र
· अभियांत्रिकी क्षेत्र
इत्यादी क्षेत्रात संगणकाचा वापर फार प्रमाणात होत आहे.
वर्ल्ड वाईड वेब च्या माध्यमातून तर संपूर्ण जग जवळ आले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती आता माऊस च्या एका क्लिक वर काही सेकंदात मिळू शकते.
BRAINLIEST PLSSS OK
Explanation:
”कम्प्युटर” अर्थात संगणका ची माहिती आणि इतिहास
आदिम काळापासुन स्वतःत आणि आपल्या सभोवताली बदल आत्मसात करत करत आजच्या युगातला माणुस जेव्हां आपल्या नजरेसमोर उभा राहातो तेव्हां मला सांगा कितीसे साम्य दिसते ? तर काहीही नाही! ज्याला जमिन-आसमानाचा फरक आपण म्हणतो तसा बदल घडला त्याने घडवला . . . युगानुयुगे मागे पडली, शतकानुशतके पार करत आपण 21 व्या शतकात पदार्पण केलं.
मग प्रश्न असा उभा राहातो की नेमकं केलं काय माणसानं? तर माणसानं स्वतःकरता अनुकुल असं वातावरण तयार केलं, खाण्यापिण्याच्या, राहाण्याच्या, सवयी बदलल्या, काम करण्याच्या पध्दतीत बदल घडला, आणि मुख्यतः माणसाने दिवसेंदिवस स्वतःचे कष्ट कमी कसे होतील याचा विचार केला.
आणि खुलजा सिम सिम म्हणावे आणि तो यावा तसा तो खरच अवतरला! त्याने माणसाला खरंच म्हंटलं “क्या हुक्म है मेरे आकां” आणि तो माणसाचा गुलाम होत त्याच्या दिमतीला क्षणाक्षणाला हजर होउ लागला. त्याने माणसाचे कष्ट मोठयाप्रमाणात कमी केले, सुर्य उगवण्यापासुन तर मावळेपर्यंत तो प्रत्येक क्षणी माणसाला हवाच आहे कारण आता त्याच्या शिवाय मानवाचे पान देखील हलत नाही . .. असा तो!
कोण बरं तो ? की ज्याच्याशिवाय जगण्याची आज आपण कल्पना देखील करू शकत नाही, तर तो दुसरा तिसरा कोणी नसुन तो आहे ”कम्प्युटर” अर्थात संगणक.
Please mark me as BRAINLIEST