Science, asked by DJDivyjaiswal, 1 year ago

give me an assay on maza adawata khal in marathi​

Answers

Answered by aryanraja
0
eror 404 not found ,ffbvvfhhdyhhkyihbfchhxdhhc
Answered by dishdhauma
1

plzz mark it as brainliest...its my heartly request to uu...

आवडता खेळ म्हटलं कि ज्याच्या त्याच्या तोंडी क्रिकेट चं नाव येतं. आज केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला या खेळाने पछाडलेलं आहे. क्रिकेट खेळणे हे भूषणावह समजले जाते. किंबहुना कित्येक पालकांना आपल्या मुलाने क्रिकेट खेळावे आणि सचिन तेंडुलकर व्हावे असेही वाटत असते. कित्येक मुलांचे आदर्श व्यक्तिमत्व हे क्रिकेटर्स असतात. परंतु मला मात्र कबड्डी हा खेळ सर्वात जास्त आवडतो. महाराष्ट्राच्या मातीतला हा रांगडा खेळ. क्रिकेटच्या झगमगाटात झाकोळला गेलेला.

महाराष्ट्रात होळी, शिमगा अशा सणांच्या वेळी हा खेळ खेळला जाई. प्रामुख्याने आखाडय़ात व तालमीत हा खेळ खेळला जाई. मुका असलेला हा खेळ हळूहळू बोलका होऊ लागला. सू सू, सूर सूर, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमानकी, हुतूतू असे वेगवेगळे शब्दोच्चारांनी हा खेळ बोलका झाला.

महाराष्ट्र व मध्यप्रदेशात लोकप्रिय असलेल्या या खेळाला हुतूतू या नावानेही ओळखले जाते. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये या खेळाला चेडुगुडू असे म्हटले जाते. कबड्डी हा खेळ भारतात जेवढा लोकप्रिय आहे तेवढाच तो भारताचे शेजारी देश नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानातही लोकप्रिय आहे. भारताबरोबरच बांगलादेश चा हि कबड्डी हा राष्ट्रीय खेळ आहे. परंतु जगभरात हा खेळ प्रसिद्ध करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे.

अमरावतीच्‍या जगविख्‍यात श्री हनुमान व्‍यायाम प्रसारक मंडळाने १९३६ मध्ये बर्लिन ऑलिंपिकमध्ये खेळाच्या प्रसारासाठी प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. त्‍यापूर्वी म्‍हणजे १९३४ मध्‍ये कबड्डीचे नियम तयार झाले आणि १९३८ पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.

१९९० साली बीजिंग येथे झालेल्या एशियाडपासून कबड्डीचा एशियामध्ये समावेश करण्यात आला. शरद पवार व बुवा साळवी यांच्या प्रयत्नांमुळे कबड्डी आंतरराष्ट्रीय झाली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कबड्डीने आशिया खंडाची वेसही ओलांडली. गेल्या पन्नास वर्षात संपूर्ण देशात कबड्डीचा विकास झाला व प्रचार झाला. कबड्डी आंतरराष्ट्रीय झाली. याचे श्रेय महाराष्ट्राला आहे.

पाटण्यात गेल्या वर्षी झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं विश्वचषकाला गवसणी घालून देशाचा तिरंगा अभिमानानं फडकावला. या विजयात मोलाचा वाटा उचलला तो दीपिका जोसेफ, अभिलाषा म्हात्रे आणि सुवर्णा बारटक्के या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्यांनी. क्रिकेटपटूंप्रमाणेच कबड्डीपटूही कोटय़धीश झाल्या, हा ‘न भूतो, न भविष्यती’ क्षण महाराष्ट्राने अनुभवला.

या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात......

hope it helped uu plzz plzz plzz mark it as brainliest...

Similar questions