give me examples of dvigu samas in marathi
Answers
Answered by
96
जेव्हा शब्दांची काटकसर करून अनेक शब्दांच्या ऐवजी एकच शब्द अथवा जोडशब्दाचा उपयोग करतात, तेव्हा त्या प्रकाराला समास असे म्हणतात. आणि या एकत्रिकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात.
समासाचे मुख्य चार प्रकार आहेत.
1. अव्ययीभाव समास
2. तत्पुरुष समास
3. द्वंद्व समास
4. बहुव्रीही समास
तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकार आहेत.
द्विगू समास हा तत्पुरुष समासातील एक उपप्रकार आहे,
द्विगू समास - ज्या समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो, त्यास द्विगू समास म्हणतात.
उदाहरण –
नवरात्र – नऊ रात्रीचा समूह
साप्ताह – सात दिवसांचा समूह
चार्तुमास – चार महिन्यांचा समूह
त्रिभूवन – तीन भुवनांचा समूह
त्रैल्योक्य – तीन लोकांचा समूह
Similar questions