English, asked by noorjan43, 29 days ago

giving golden egg hen in marathi written story



Answers

Answered by GeniusKrishnali3
2

Answer:

एका गावात 'दामू' नावाचा एक माणूस राहात होता. तो देवाचा भक्त होता. त्याच्या भक्तीवर खूष होऊन एक दिवस देवाने त्याला एक कोंबडी बक्षीस दिली. ही कोंबडी दररोज एक सोन्याचे अंडे द्यायची. दामू ते अंडे सोनाराला विकून भरपूर पैसा मिळवायचा. असे बरेच दिवस चालले होते. एक दिवस दामूच्या मनात विचार आला. रोज अंडे मिळणार आणि ते विकून हळूहळू पैसे मिळण्यापेक्षा एकदम पैसे मिळाले तर लगेच एखादा बंगला खरेदी करता येईल. शेतीवाडी घेता येईल. घरात नोकरचाकर ठेवता येतील आणि एक श्रीमंत गृहस्थ म्हणून शहरांत फिरता येईल

घरात पत्नीला, मुलांना हिर्‍या मोत्याचे अलंकार आणि उंची वस्त्रे देता येतील. घरात बाहेर सर्व ठिकाणी आपला सन्मान होईल. ही कोंबडी रोज एक सोन्याचे अंडे देते. म्हणजे हिच्या पोटात असंख्य सोन्याची अंडी असतील. हिला कापून ती सर्व अंडी एकाच वेळी मिळवता येतील.

एक दिवस संधी साधून त्याने त्या कोंबडीचे पोट चिरले. क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात कोबडी मरून पडली. तिच्या पोटात दामूला एकही अंडे सापडले नाही. अति लोभाने दररोज मिळणारे सोन्याचे अंडे त्याने गमावले आणि कोंबडीही गमावली. बिचारा आपल्या नशिबाला बोल लावीत रडत बसला. म्हणून म्हणतात की ‍अति लोभाचा फळ नेहमी वाईट असतो.

Hope it helps:)

Similar questions