World Languages, asked by hirdekar, 9 months ago

google maza guru essay in marathi​

Answers

Answered by halamadrid
18

Answer:

प्रत्येक माणसाच्या जीवनात कोणी न कोणीतरी गुरु असतोच.एखादे गुरुजी,संत महात्मे,शिक्षक किंवा इतर कोणालातरी लोकं गुरु मानतात.

आताच्या या डिजिटल काळात 'गूगल'ला आपले डिजिटल गुरु समजले जाऊ शकते.एखाद्या गुरूसारखा गूगल आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देत असतो.आपल्याला काही शंका असल्या,तर त्या शंकांचे समाधानकारक उत्तर आपल्याला गूगलकडून मिळते.गूगलमुळे आपल्या अभ्यासात आणि कामात खूप मदत होते.

गूगलकडे संपूर्ण जगाची माहिती असते.गुगलकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते.पण,गूगल आपल्याला चांगले-वाईट यामधील फरक नाही शिकवू शकत.तो आपल्याला वाईट संगतीपासून दूर नाही ठेवू शकत.

जर गूगलचा योग्य प्रकारे उपयोग केला तरच तो आपल्यासाठी उत्तम गुरु ठरू शकतो.

Explanation:

Similar questions