India Languages, asked by DEMONKING4993, 1 year ago

Guru che mahatva essay in marathi

Answers

Answered by Anonymous
17

गुरुचे महत्त्व

आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा. गुरुच आपणाला अज्ञानातून बाहेर काढतात. शिक्षक हे आपले गुरुच आहेत. त्यामुळे आपण गुरुपौर्णिमेच्याच दिवशी ‘शिक्षकदिन’ साजरा करून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायला हवी. प्रथम आपण ‘गुरु’ या शब्दाचा अर्थसमजून घेऊया. ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात.

आपल्यावर निरनिराळे संस्कार करून आपल्याला समाजाशी एकरूप व्हायला शिकवणारे आई-वडील हे आपले पहिले गुरु !

बालपणात आई-वडील आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवतात. योग्य काय आणि अयोग्य काय, याची जाणीव करून देतात. तसेच चांगल्या सवयी लावतात.म्हणून आपण त्यांचा आदर करायला हवा आणि प्रतिदिन त्यांना नमस्कार करायला हवा.

आपल्याला अनेक गोष्टी शिकवून सर्वांगाने परिपूर्ण करणारे शिक्षक, हेच आपले दुसरे गुरु !

खरेतर आपण शिक्षकदिन गुरुपौर्णिमेला साजरा करून या दिवशी त्यांना भावपूर्ण नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायला हवा. गुरु म्हणजे आपले शिक्षक आणि शिष्य म्हणजे आपण असतो; म्हणून आपण शिक्षकदिन याच दिवशी साजरा करायला हवा.

शिक्षक आपल्याला अनेक विषयांचे ज्ञान देतात. ते इतिहास शिकवतात. त्यातून ते आपल्यातील राष्ट्राभिमान जागृत करतात. आपण आपल्यासाठी जगायचे नसते, तर राष्ट्रासाठी जगायचे असते, हा व्यापक विचार आपल्याला देतात. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव इत्यादी क्रांतीकारकांनी राष्ट्रासाठी प्राणार्पण केले, त्याप्रमाणे आपण त्याग करायला हवा. ‘त्याग हा आपल्या जीवनाचा पाया आहे’, हे आपल्याला शिक्षक सांगतात. त्यागी मुलेच राष्ट्राचे रक्षण करू शकतात. इतिहासातून आपले आदर्श ठरतात, उदा. छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर हेच आपले खरे आदर्श आहेत. त्यांच्याप्रमाणे आपण त्यागी असायला हवे.आपल्या जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे !

Similar questions