India Languages, asked by patilsejal511, 2 months ago

guys its a project if dont know please dont answer prakruti vishistam of orissa in sanskrit or marathi​

Answers

Answered by NiyaSurve
3

Answer:

ओड़िशा (मराठी नामभेद: ओरिसा ; रोमन लिपी: Odisha) भारत देशाच्या २९ राज्यांपैकी एक राज्य आहे. ओड़िशा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तरेला असून त्याच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, उत्तरेला पश्चिम बंगाल व झारखंड, पश्चिमेला छत्तीसगढ, नैर्ऋत्येला तेलंगण तर दक्षिणेला आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत. भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.भुवनेश्वर आणि कटक ही जुळी शहरे आहेत. क्षेत्रफळानुसार ओरिसा भारतातील ९व्या क्रमांकाचे तर लोकसंख्येनुसार ११व्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. ओरिसाला ४८५ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

ओड़िशा

ଓଡ଼ିଶା

देश=भारत

ध्वज =भारत

स्थापना=१ एप्रिल १९३६

राजधानी=भुवनेश्वर

सर्वात मोठे शहर=भुवनेश्वर

जिल्हे=३०

क्षेत्रफळ=१,५५,७०७ चौ. किमी (६०,११९ चौ. मैल) (९ वा)

लोकसंख्या (२०११)- घनता४,१९,४७,३५८ (११वा)

- २७० /चौ. किमी (७०० /चौ. मैल)

प्रमाणवेळ=भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)

प्रशासन

- राज्यपाल

- मुख्यमंत्री

- विधीमंडळ (जागा)

- उच्च न्यायालय

प्रो. गणेशलाल

नवीन पटनायक

ओडिशा विधानसभा (१४७)

ओडिशा उच्च न्यायालय

राज्यभाषा

ओड़िया

आय.एस.ओ. कोड

ओड़िशाची विविध नावे : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़़ीसा, ओडिसा, ओड़िशा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa

पुरी, ओड़िशा येथील जगन्नाथ मंदिर, कोणार्क येथील सूर्य मंदिर इत्यादी जगप्रसिद्ध सांस्कृतिक स्थाने असलेल्या ओडिशामध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचे अनेक ठसे आढळतात. कोणार्कच्या सूर्यमंदिराजवळ पुराणांत वर्णन केलेली चंद्रभागा नदी होती. आता तेथे चंद्रभागा बीच आहे.

Similar questions