India Languages, asked by aniketsohani, 1 year ago

guys,please give me sentences for the following marathi proverbs
1. ikde aad tikde vihir.

2. Gharoghari matichya chuli.

3. Undrala manjar saksha.

4. Adla Narayan,Gadhvache pay darit

5. Dam Kari Kam

Answers

Answered by prabhat00127
7

1) on both side there is danger and you stuck in between.

Answered by halamadrid
10

■■ प्रश्नात विचारलेल्या म्हणी, त्यांचा अर्थ व वाक्यात प्रयोग:■■

१. इकडे आड तिकडे विहीर - दोन्हीं बाजूंनी संकटात किंवा अडचणीत सापडणे.

वाक्य - आई खोडकर राजूला समझावताना म्हणाली, 'राजू, तू आताचा सुधार. नाहीतर ,एक दिवशी तुझ्यावर इकडे आड तिकडे विहीर, अशी परिस्थिती येईल.

२. घरोघरी मातीच्या चुली - सगळीकडे सारखीच परिस्थिती किंवा समस्या असतात.

वाक्य - सासूने धाकट्या सुनेला समझावताना सांगितले, "सुनबाई,घरोघरी मातीच्या चुली असतात मात्र समस्यांसाठी समाधान कसे काढायचे, हे आपल्यावर

अवलंबून असते."

३. उंदराला मांजर साक्ष - वाईट काम करताना एकमेकांना मदत करणे.

वाक्य - देशाविरुद्ध कट रचनाऱ्या आतंगवाद्यांना पाकिस्तानने साथ देणे म्हणजेच उंदराला मांजर साक्ष!

४. अडला नारायण गाढवाचे पाय धरी- अडचणीत, माणसाला मूर्ख माणसाची सुद्धा विनवणी करायला लागते.

वाक्य - हुशार साक्षीला ऐन परिक्षेच्या वेळी इतिहासाचे नोट्स सापडत नसल्यामुळे , मठ्ठ राकेशकडून मदत मागावी लागली. तेव्हा तिला अडला नारायण गाढवाचे पाय धरी, ही म्हण आठवली.

५. दाम करी काम - पैसे असले तर सगळे काम सहज होतात.

वाक्य - हुशार रिद्धिला चांगले गुण मिळूनसुद्धा तिला जे.के. कॉलेजमध्ये एडमिशन मिळाले नाही, तर कमी गुण मिळवणाऱ्या साक्षीला लगेच एडमिशन मिळाले. असे म्हणतात ना, दाम करी काम!

Similar questions