Math, asked by bushhhhhh3097, 2 months ago

हा बागेत भेटत नाही तो अर्धा आहे फुल आणि अर्धा आहे फळ दिसायला आहे काळा पण खुप गोड आहे सांगा बर मी कोण?

Answers

Answered by Sauron
69

उत्तर :

गुलाब जामून

स्पष्टीकरण :

दिलेल्या प्रश्नानुसार :

हा बागेत भेटत नाही -

गुलाब जामुन हा एक मिठाई चा प्रकार आहे. गुलाब जामून बागेमध्ये मिळत नाही तर हा मिठाईचा प्रकार कोणत्याही मिठाईच्या दुकानात उपलब्ध असतो.

अर्धा आहे फुल आणि अर्धा आहे फळ -

गुलाब जामून या नावात गुलाब हे एका फुलाचे नाव आहे तर जामून यांचा समावेश फळांमध्ये केला जातो.

दिसायला आहे काळा पण खुप गोड आहे :

या मिठाईच्या एक प्रकारामध्ये रंग काळा असतो. देसी काला जामून या नावाने ओळखला जातो.

वरील स्पष्टीकरणावर असे स्पष्ट होते की,

दिलेल्या शब्द कोड्याचे उत्तर गुलाब जामून आहे.

Attachments:
Similar questions