History, asked by manjiri7, 11 months ago

हाडांच्या भुकटीचा उपयोग​

Answers

Answered by Milindkhade
0

नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंत परिवेष्टनशास्त्र विभागाच्या वतीने मानवी व कृत्रिमरीत्या तयार होणाऱ्या हाडांच्या भुकटीचा कृत्रिम दात निर्मितीवर काय परिणाम होतो? यावर संशोधन करण्यात आले. त्यात मानवी हाडांची भुकटी कृत्रिम दात निर्मितीसाठी सर्वोत्तम असल्याचे पुढे आले. सोबत कृत्रिम हाडांची भुकटी ही विश्वासदर्शक नसल्याचेही निदर्शनात आले. हे संशोधन डॉ. वैभव कारेमोरे यांच्या मार्गदर्शनात झाले.

हिरडय़ांच्या आजारात जबडय़ाच्या हाडाची गळती होत असते. या रुग्णांमध्ये दातांचा आधार वाढविण्यासाठी नवीन हाडांच्या निर्मितीची गरज असते. शिवाय अत्याधुनिक दंत प्रत्यारोपणातदेखील जबडय़ाच्या हाडाची उंची वाढवण्याकरिता दंत चिकित्सेत हाडांची भुकटी (बोन ग्राफ्ट मटेरीयल) वापरली जाते. दंत वैद्यक शास्त्राच्या दंत परिवेष्टनशास्त्र विभागात या विषयांतर्गत शस्त्रक्रिया केल्या जातात. गेल्या ४० वर्षांपासून ही भुकटी वापरली जात आहे. पण शास्त्रीयदृष्टय़ा हाडांच्या भुकटीचे नैसर्गिक हाड तयार होते की ते फक्त दाताला मेकॅनिझम सपोर्ट देण्याकरिता जबडय़ात राहतात हा तिढा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे.

शस्त्रक्रियेनंतर भुकटीचे हाडात रूपांतर झाले की नाही, हे पाण्यासाठी परत शस्त्रक्रिया करणे वैज्ञानिकदृष्टय़ा योग्य नाही. त्यासाठी मानवी पेशींचे हाडाच्या भुकटीच्या सानिध्यात होणारे बदल आणि जडण- घडण मानवी शरीराबाहेर तपासणे आवश्यक आहे. डॉ. वैभव कारेमोरे यांनी विद्यार्थी व इतर शिक्षकांच्या मदतीने हिस्लॉप स्कूल ऑफ बायोटेक्नोलॉजी विभागातील तत्कालीन शास्त्रज्ञ डॉ. देवव्रत बेडगे यांच्या नेतृत्वात या प्रकल्पावर काम सुरू केले. संशोधनात मानवी हाडांची भुकटी रुग्णाच्या हाडापासून मिळवून तसेच व्यावसायिकदृष्टय़ा उपलब्ध असलेली मानवी हाडांची भुकटी आणि कृत्रिम तयार केलेली सिलीकॉनची भुकटी यांची प्रथिने वेगळी केली.

मानवी हाडांची निर्मिती करणाऱ्या मानवी शरीरातील फायब्रोब्लास्ट या पेशींचे प्रयोगशाळेत सेललाईन तयार केले. त्यानंतर हाडांच्या भुकटीच्या प्रथिनांचे अर्क या सेललाईनमध्ये मिश्रित केले. संशोधनात हाडांच्या भुकटीच्या प्रथिनांच्या वातावरणात मानवी पेशी जिवंत राहण्याचे प्रमाण समविभाजन (वाढवणारे) असल्याचे पुढे आले. संशोधनात मानवी शरीरात रुग्णाच्या शरीरातून काढलेली भुकटी ही दंत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकरिता सर्वोत्तम पर्याय आहे. त्या पाठोपाठ बाजारात उपलब्ध असलेली मानवी हाडांची भुकटी अल्प परिणामकारक आढळून आली. तर कृत्रिम हाडांच्या भुकटीत कुठलेही विश्वासदर्शक निकाल आढळले नाही.

Similar questions