१) हंगामी सरकारचे
हे प्रमुख होते.
(अ) वल्लभभाई पटेल
(ब) महात्मा गांधी
(क) पं.जवाहरलाल नेहरू (ड) बॅ.जीना
Answers
Answered by
7
Answer:
(क) पं.जवाहरलाल नेहरू
Answered by
0
Answer:
पंडित जवाहरलाल नेहरू
Explanation:
दुसऱ्या महायुद्धानंतर भारतात त्रिमंत्री योजना लागू केली गेली. योजनेनुसार भारतात अप्रत्यक्ष निवडणुका घेतल्या गेल्या. निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरला.
त्यानंतर त्रिमंत्री योजनेनुसार भारतात घटना समितीची स्थापना झाली. घटना समिती भारताची राज्यघटना तयार करत असताना भारताला स्वातंत्र्य मिळणार होते म्हणून भारतात हंगामी सरकारची स्थापना झाली. हंगामी सरकारची स्थापना तत्कालीन व व्हाईसराय सर व्हेवेल यांनी केली.
हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून सर्वानुमते पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड करण्यात आली.
Similar questions