India Languages, asked by shivangidsingh0708, 9 months ago

६. हे खरे खरे व्हावे...
एका. म्हणा. वाचा.
हवेवरी त्या होत स्वार मी
अवकाशी विहरावे,
मनात माझ्या नेहमी येते
मी पक्षी व्हावे...
दवबिंदू होऊनी पहाटे
गवतावर उतरावे,
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी
पुन्हा पुन्हा परतावे...
क्षितिजावरचे गडद रंग मी
ढग होऊनी झुलावे,
भरारणारा होऊन वारा
चंद्राशी खेळावे...
धुक्यापरी मी अलगद अलगद
धरणीवर उतरावे,
अवघे जग झाकूनी तयाला
मिष्किलतेने पहावे...
उर्जेचा तो स्रोत सूर्य मी
अगदी जवळून पहावा,
काळोखाला चिरत चिरत मी
सूर्य किरण व्हावा...
निसर्गातल्या रंगामध्ये
मी रंगून जावे,
भास नको मज, तुम्हा सांगतो
हे खरे खरे व्हावे...
सुमती पवार
00 please explain these poem​

Attachments:

Answers

Answered by gorakhkadam882
2

Answer:

हे खरे खरे व्हावे...

एका. म्हणा. वाचा.

हवेवरी त्या होत स्वार मी

अवकाशी विहरावे,

मनात माझ्या नेहमी येते

मी पक्षी व्हावे...

दवबिंदू होऊनी पहाटे

गवतावर उतरावे,

सूर्यप्रकाशे वाफ होऊनी

पुन्हा पुन्हा परतावे...

क्षितिजावरचे गडद रंग मी

ढग होऊनी झुलावे,

भरारणारा होऊन वारा

चंद्राशी खेळावे...

धुक्यापरी मी अलगद अलगद

धरणीवर उतरावे,

अवघे जग झाकूनी तयाला

मिष्किलतेने पहावे...

उर्जेचा तो स्रोत सूर्य मी

अगदी जवळून पहावा,

काळोखाला चिरत चिरत मी

सूर्य किरण व्हावा...

निसर्गातल्या रंगामध्ये

मी रंगून जावे,

भास नको मज, तुम्हा सांगतो

हे खरे खरे व्हावे...

सुमती पवार

Explanation:

Hope your answer is complete.

"please follow Me ".

Answered by youngscientist28
0

Explanation:

कवयित्रीला अवकाशात फिरावेसे वाटते. कधी दवबिंदू होऊन, तर कधी धरणीवर उतरावेसे वाटते. निसर्गाच्या रंगांमध्ये खरेखुरे रंगून जावेसे वाटते.

हवेवरी त्या होत स्वार मी

अवकाशी विहरावे,

मनात माझ्या नेहमी येते

मी पक्षी व्हावे...

Meaning:- कवयित्री म्हणते माझ्या मनात नेहमी असे वाटते की हवेवर आरूढ होऊन मी आकाशात फिरावे. पक्षी होऊन मनमुक्त संचार करावा.

दवबिंदू होऊनी पहाटे

गवतावर उतरावे,

सूर्यप्रकाशे वाफ होऊनी

पुन्हा पुन्हा परतावे...

Meaning:- दवबिंदूचे रूप घेऊन गवतावर पहाटे उतरावे आणि सूर्यप्रकाश येताच वाफ होऊन पुन्हा (आकाशात) निघून जावे.

क्षितिजावरचे गडद रंग मी

ढग होऊनी झुलावे,

भरारणारा होऊन वारा

चंद्राशी खेळावे...

Meaning:- कधी मला असे वाटते की क्षितिजावरचे दाट रंग मी व्हावे, ढगाचे रूप घेऊन झुलावे. कधी वेगाने वाहणारा वारा होऊन चंद्राशी खेळावे.

धुक्यापरी मी अलगद अलगद

धरणीवर उतरावे,

अवघे जग झाकूनी तयाला

मिष्किलतेने पहावे...

Meaning:- चुके होऊन कधी हळूच धरतीवर उतरावे. सगळ्या सृष्टीवर धुके पांघरून खोडकरपणे पाहत बसावे.

उर्जेचा तो स्रोत सूर्य मी

अगदी जवळून पहावा,

काळोखाला चिरत चिरत मी

सूर्य किरण व्हावा...

Meaning:-कधी मला असे वाटते की उष्णताच ज्यापासून निघते, तो सूर्य अगदी जवळून पाहावा. अंधाराला चिरत जाणारा मी सूर्याचा किरण व्हावे.

निसर्गातल्या रंगामध्ये

मी रंगून जावे,

भास नको मज, तुम्हा सांगतो

हे खरे खरे व्हावे...

Meaning:- मला खरेच असे वाटते की निसर्गाच्या या मनमोहक रंगामध्ये स्वतः रंगून जावे. तुम्हांला सांगते, हा माझा भास नव्हे; मला खरेखुरेच हे सर्व व्हावेसे वाटते.

I hope this answer is helpful for you.

Please Give a like and follow me....

Thank you!!

Similar questions