History, asked by Blockhead4779, 1 year ago

होलोसिन कालखंड म्हणजे काय​

Answers

Answered by samruddhimore979
0

Answer:

होलोसीन : (नूतनतम काळ किंवा युग) . भूवैज्ञानिक इतिहासाच्या सर्वांत अलीकडच्या व चालू विभागाचे हे नाव आहे. या कालविभागाला नूतनतम किंवा हिमनद-पश्च कल्प वा काळ म्हणतात आणि या काळात तयार झालेले खडक, प्रक्रिया, घटना व पर्यावरण यांनाही होलोसीन म्हणतात. हा ⇨ चतुर्थ कल्पातील ⇨ प्लाइस्टोसीननंतरचा काळ असून तो गेली दहा हजार वर्षे ते आजपर्यंतचा काळ मानतात. पूर्वी यालारीसेंट किंवा अभिनव कल्प म्हणत असत. हा प्लाइस्टोसीनच्या शेवटच्या टप्प्यानंतरचा काळ असून सापेक्षतः उबदार जलवायुमानीय (दीर्घकालीन सरासरी हवामानाची) परिस्थिती ही या काळाचे गुणवैशिष्ट्य आहे. मानवाच्या इतिहासाच्या दृष्टीने होलोसीन महत्त्वाचा काळ आहे. कारण आधीच्या अश्मयुगानंतरच्या काही हजार वर्षांत माणसाने विकसितकेलेल्या कौशल्यामुळे सध्याची सांस्कृतिक पातळी गाठली गेली आहे.या काळात मानवी व्यवहारांमुळे पृथ्वीच्या पर्यावरणात पुष्कळ फेरबदल झाले आहेत.

Similar questions