World Languages, asked by aayushi84, 1 year ago

होली या सन ची तयारी कशी करवे

Answers

Answered by chavan1234
22
होळी हा एक हिंदू सण आहे, तो पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. होळी म्हणजे सत्याचा असत्यावर विजय, वाईटावर चांगलेपणाचा विजय. वसंत ऋतू च्या स्वागतासाठी सुद्धा होळी साजरी केली जाते. होळीच्या दिवशी सगळे वातावरण खूप प्रसन्न आणि आल्हाददायक असते. होळीच्या दिवशी लोक एकत्र येतात, आपले रुसवे फुगवे विसरून जातात.

होळी हा २ दिवसांचा सण आहे, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या सायंकाळी याची सुरवात होते. इंग्रजी पंचांगानुसार होळी फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येऊ शकते. या वर्षी, साल २०१८ मध्ये होळी २ मार्चला आहे. होळीच्या पहिल्या दिवसाला छोटी होळी म्हणतात, या दिवशी लोक होलिका दहन करतात, पूजा करतात.

खूप वर्षां पूर्वी गावचे सगळे लोक वादविवाद विसरून होलिका दहन साठी एकत्र येत असत. त्या साठी लागणारी लाकडं, गवात मिळून जमा करत असत. सर्व स्त्रिया एकत्र नैवद्य बनवत, पूजेची तैयारी करत असत. होळी म्हणजे फक्त एक सण नसून समाजाचा एक महत्वाचा घटक सुद्धा होता, तो लोकांना एकत्र आणायचा. पण आजकाल, लोक एकत्र येत नाहीत. जो तो आपल्या अंगणात स्वतःची होळी बनवतो. त्यामुळे होळीची पहिल्या सारखी मजा येत नाही आणि होळीची खरी परंपरा, संदेश नवीन पिढीकडे पोहचतच नाही.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला रंग पंचमी बोलतात, कोणी या दिवसाला रंगावली, सुद्धा म्हणतात. रंगपंचमी खर तर होलिकादहनाच्या राखेपासून खेळत असत, पण आजकाल आपण कृत्रिम, रासायनिक रंगच वापरतो. पुरातन काळात होळीचा रंग हा गुलाल, हळद, कुंकू, चंदन पूड आणि सुवासिक वनस्पतींपासून बनवत असत. आजकाल आपण रंगबिरंगी पावडर, पाण्याचे फुगे आणि पिचकारी सोबत रंगपंचमी खेळतो. या दिवशी कोणीही कुणालाही रंगात भिजवून टाकते, आणि लोक सुद्धा हसत हसत रंग खेळतात.

Similar questions