हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टीकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Answers
Answer:
मिंग्वे, अर्नेस्ट : (२१ जुलै १८९९–२ जुलै १९६१). अमेरिकन कादंबरीकार आणि कथाकार. जन्म अमेरिकेतल्या इलिनॉय राज्यातील अर्नेस्ट हेमिंग्वे
अर्नेस्ट हेमिंग्वे
ओक पार्क येथे. त्याचे वडील क्लेरन्स एडमंड्स हेमिंग्वे हे डॉक्टर होते. शिकार, मासेमारी हे त्यांचे आवडते छंद होते. त्याची आई ग्रेस हॉल हेमिंग्वे ह्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. चर्चच्या कामांत त्या उत्साहाने भाग घेत असत. त्यांनी त्याला सेल्लो हे वाद्य शिकण्यास आणि चर्चच्या गानवृंदात (क्वायर) सहभागी होण्यास प्रवृत्त केले. हेमिंग्वेच्या आयुष्याची आरंभीची वर्षे आईच्या स्त्रैण प्रभावाशी झगडण्यात आणि वडिलांचा पुरुषी स्वभाव आत्मसात करण्यात गेली. शालेय जीवनातच तो लिहू लागला. शालेय जीवनात एक क्रीडापटू आणि जोमदार व्यक्तिमत्त्वाचा विद्यार्थी म्हणून त्याने लौकिक प्राप्त केला होता. त्याला बाहेर भटकायला आवडे. घरातून तो दोनदा पळून गेला होता. १९१७ मध्ये त्याचे शालेय शिक्षण संपले तथापि उच्च शिक्षणासाठी तो महाविद्यालयात गेला नाही. कॅन्सास सिटी ह्या ठिकाणी जाऊन त्याने कॅन्सास सिटी स्टार ह्या त्यावेळच्या आघाडीच्या वृत्तपत्रात वा र्ता ह रा ची नोकरी स्वीकारली. तेथे त्याला पत्रकारितेचे उत्तम व्यावसायिक प्रशिक्षण मिळाले. १९१७ सालीच अमेरिका पहिल्या महायुद्धात उतरली, तेव्हा लष्करी सेवेत शिरण्यासाठी त्याने पुनःपुन्हा प्रयत्न करूनही, त्याच्या डोळ्यात काही दोष असल्यामुळे त्याला त्या सेवेत घेतले गेले नाही तथापि अमेरिकन रेड क्रॉसच्या रुग्ण-वाहिकेचा ड्रायव्हर म्हणून त्याने पहिल्या महायुद्धात काम मिळविले. ८ जुलै १९१८ रोजी ऑस्ट्रो-इटालियन आघाडीवर फोस्साल्ता दी प्यॉव्ही येथे तो जखमी झाला. परंतु त्या अवस्थेतही एका जखमी माणसाला पाठीवर घेऊन तो उपचारकेंद्रावर गेला. या शौर्याबद्दल त्याला गौरविले गेले. त्या वेळी तो जेमतेम १९ वर्षांचा होता. जखमी अवस्थेत मिलान येथील रुग्णालयात उपचार घेत असताना ॲग्नेस फोन कुरोव्हस्की ह्या रेड क्रॉससाठी काम करणाऱ्यार्सच्या प्रेमात तो पडला तथापि तिने त्याच्याशी विवाह करण्यास नकार दिला. ह्या अनुभवांचे विस्मरण त्याला कधीही झाले नाही.
पहिले महायुद्ध संपल्यानंतर टोरोंटो स्टार ह्या नियतकालिकाचापरदेशी प्रतिनिधी म्हणून त्याने काम केले. नंतर तो मिशिगनला परतला, तेव्हाच त्याने कथा-कादंबऱ्यांचे लेखन करण्याचा निर्णय घेतला होता. यूरोपमध्ये जाण्याचीही त्याची इच्छा होती. त्याच्या अनेक प्रायोगिक कथांनी प्रभावित झालेला तत्कालीन प्रसिद्ध लेखक शर्वुड अँडरसन ह्याने त्याला स्वदेशत्याग करून फ्रान्समध्ये गेलेल्या गटर्र्ड स्टाइन आणि एझरा पाउंड ह्यांना परिचयपत्रे दिली. ती घेऊन हेमिंग्वे आणि त्याची पत्नी हेड्ली रिचर्ड्सन पॅरिसला गेली. तेथील जीवन तसे दारिद्र्याचे होते तथापि हेमिंग्वेच्या दृष्टीने ते त्याच्या आयुष्यातील सर्वांत सुखाचे दिवस होते. त्यात त्याची सर्जनशीलताही फुलून आली.
१९२३ मध्ये थ्री स्टोरीज अँड टेन पोएम्स हे त्याचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्यातल्या कविता फारशा महत्त्वपूर्ण नव्हत्या पण त्याच्या कथांतून त्याच्या प्रतिभेची चुणूक दिसून येत होती. १९२५ मध्ये इन अवर टाइम हा त्याचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला (पॅरिसमध्ये १९२४ मध्ये) .ह्या संग्रहातील कथांसाठी मिशिगनमधल्या त्याच्या अनुभवांचा त्यानेवापर करून घेतला. त्याचप्रमाणे दुःख आणि हिंसा ह्यांच्या जगात प्रवेश करणाऱ्या तरुण निक अडॅम्सची व्यक्तिरेखा त्याने उभी केली. हेमिंग्वेने पुढे निर्माण केलेल्या नायकांचे आदिरूप निक अडॅम्समध्ये आढळते. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या द सन ऑल्सो रायझिस (१९२६) ह्या कादंबरीने त्याला फार मोठी लोकप्रियता प्राप्त करून दिली. पहिल्या महायुद्धाच्या काळात शारीरिक, तसेच भावनिक दृष्ट्या दुःख सोसलेल्या आणि स्वदेशत्याग केलेल्या इंग्रज आणि अमेरिकन व्यक्तींचा समूह ह्या कादंबरीत दाखवलेला आहे. एका संपूर्ण पिढीचे दिशाहीन अस्तित्व, मानसिक दिवाळखोरी आणि ढासळलेली नैतिकता ही कादंबरी प्रभावीपणे व्यक्त करते.
१९२७ मध्ये मेन विदाउट विमेन हा त्याचा दुसरा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. ह्या कथासंग्रहामुळे कथालेखनावर विलक्षण हुकमत असलेला लेखक म्हणून तो मान्यता पावला. ज्याला ठार करण्यासाठी एक गुन्हेगारी टोळी उभी राहिलेली आहे, तिला भिऊन पलायन करण्यास खंबीरपणे नकार देणारा ओल अँडरसन (‘द किलर्स’), नुकताच रुग्णालयातून बाहेर आलेला आणि तरीही बैलाशी युद्ध करणारा मान्वेल गार्सिआ (‘द अनडिफिटेड’), वेश्या आणि समलिंगी कामुकतेच्या जगाशी अकाली परिचय झालेला निक अँडरसन (‘द लाइट ऑफ द वर्ल्ड’) ह्यांसारख्या व्यक्तिरेखांच्या कथा या संग्रहात आहेत.
Explanation: