हिमालय हा उंच पर्वत आहे.(या वाक्यातील विशेष नाम ओळखा.) *
Answers
Answer:
दिलेल्या वाक्यात हिमालय हे विशेष नाम आहे.
Explanation:
नामाचे वेगवेगळे प्रकार असतात. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम.
विशेष नाम म्हणजे असे नाम की ज्यातून एखाद्या व्यक्तीचा, प्राण्याचा, वस्तूचा आणि जागेच्या विशिष्ट असा उल्लेख होतो. त्या नामावरून त्या समुदाया पैकी एका विशिष्ट अशा व्यक्ती, जागा, किंवा वस्तूचा अंदाज येतो त्यावरून त्या ठेवलेल्या नावाला विशेष नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ- नदी ही पवित्र आहे.
या वाक्यात नदी हे सामान्य नाम आहे. नदी या नामावरून कुठल्याही एका विशिष्ट अशा नदीचा उल्लेख होत नाही.
पण गंगा ही पवित्र नदी आहे. असे जर म्हटले तर दिलेल्या वाक्यात गंगा हे विशेष नाम आहे. कारण गंगा या विशिष्ट नदीचा त्यातून उल्लेख होतो.
तसेच दिलेले वाक्य हिमालय हा उंच पर्वत आहे असे आहे. म्हणूनच दिलेल्या वाक्यात एका विशिष्ट अशा पर्वताचा उल्लेख केला आहे आणि त्याचे नाव हिमालय असे आहे, म्हणून हिमालय हे विशेषनाम आहे.
Answer:himalaya
Explanation: