२. हिमालय टीपा लिहा
Answers
Answer:
???????????????????????
Step-by-step explanation:
??
Step-by-step explanation:
हिमालय : जगातील सर्वाधिक उंचीचा आणि विशाल पर्वतसमूह.हा सर्वांत तरुण आणि पश्चिम-पूर्व पसरलेला सर्वाधिक लांबीचा घडीचापर्वत आहे. लांबी सु. २,५०० किमी. रुंदी सु. १५०–४०० किमी. आणि क्षेत्रफळ सु. ५,००,००० चौ. किमी. रेखावृत्तीय विस्तार ७३° पू.ते ९५° पू. रेखांश. पर्वताची रुंदी पश्चिमेस जास्त असून पूर्वेस त्यामानाने कमी आहे. भारताच्या उत्तर सरहद्दीवर पश्चिम-पूर्व दिशेत पसरलेली ही सलग पर्वतश्रेणी असून तिच्या उत्तरेस विस्तीर्ण असे तिबेटचे पठार, तर दक्षिणेस उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे. पश्चिमेस भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील पाकव्याप्त भागात जेथे सिंधू नदी एक मोठे वळण घेते, तेथपासून किंवा तेथील नंगा पर्वतशिखरापासून ते पूर्वेस ब्रह्मपुत्रा नदीएक मोठे वळण घेऊन पुढे भारतात प्रवेश करते, तेथपर्यंत किंवातेथील नामचा बारवा शिखरापर्यंतच्या पर्वतश्रेण्यांचा समावेश हिमालयपर्वतात केला जातो. भारताची उत्तर सरहद्द हिमालय पर्वतश्रेणीने सीमितझालेली आहे. हिमालयाचा आकार कमानीसारखा असून त्या कमानीचीबहिर्वक्र बाजू दक्षिणेस भारताच्या बाजूला आहे. हिमालयाचा विस्तार पाकिस्तान, चीन (तिबेट), नेपाळ, भूतान या देशांत आणि भारतातीलजम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशया राज्यांत आहे.
जगातील इतर प्रमुख पर्वतांप्रमाणेच हा पर्वतही प्राचीन सागरीतळावर वलीकरण प्रक्रियेतून उंचावला गेलेला भूसांरचनिक पर्वत आहे. हिमालयाचे वलीकरण दोन पठार शृंगांभोवती झालेले असून त्यांपैकीएक शृंग पाकिस्तानच्या सरगोधा जिल्ह्यातील किराणा हिल येथे, तरदुसरे मेघालयातील शिलाँग पठार येथे आढळते. शृंगाभोवती पर्वतालातीव्र वळण प्राप्त झालेले असते, त्याला अक्षकेंद्र असे म्हणतात. अशादोन अक्षकेंद्रांपैकी एक केंद्र जम्मू व काश्मीर राज्यातील नंगा पर्वत, तर दुसरे नामचा बारवा हे आहे. हिमालयासह आशियातील पर्वत-श्रेणींचा आकृतिबंध खंडाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पामीरच्यापठाराच्या संदर्भाने स्पष्ट करता येतो. ‘पामीर नॉट’ (जगाचे छप्पर) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्वतांतर्गत पठाराचा विस्तार ताजिकिस्तान, चीन (तिबेट), भारत आणि अफगाणिस्तान यांच्या सीमाभागांत आहे. चोहोबाजूंनी पर्वतांनी वेढल्यामुळे पामीरसह हा संपूर्ण प्रदेश एक पर्वतसमुच्चय बनला आहे. पामीरपासून अनेक लहानमोठ्या पर्वतरांगानिरनिराळ्या दिशांनी विस्तारलेल्या आहेत. त्यांमध्ये पूर्वेस जाणाऱ्याअल्ताई, कुनलुन व काराकोरम या रांगा, ईशान्येकडे जाणारी तिएनशानरांग, नैर्ऋत्येकडे जाणारी हिंदुकुश पर्वतश्रेणी, तर आग्नेयीस जाणारीहिमालय पर्वतश्रेणी यांचा समावेश होतो. हिमालयाव्यतिरिक्त इतर श्रेण्या हिमालयात समाविष्ट केल्या जात नसल्या, तरी त्या हिमालयाशीचनिगडित आहेत. हिमालयाच्या उत्तरेस सिंधू नदीच्या पलीकडील जटिलपर्वतप्रणालीत काराकोरम श्रेणी असून तिचा विस्तार पामीर पठारापासूनकैलास रांगेपर्यंत आढळतो. काराकोरम श्रेणीत के -२ किंवा मौंट गॉडविन ऑस्टिन (८,६११ मी.) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. काराकोरम श्रेणीत ध्रुवीय प्रदेशाच्या बाहेरील सर्वांत लांब हिमनद्या आहेत. सिंधू नदीने काराकोरमबरोबरच लडाख व कैलास पर्वतश्रेण्याही हिमालयापासून अलग केल्या आहेत. ब्रह्मपुत्रेच्या वरच्या खोऱ्यामुळे हिमालयाच्या मुख्य श्रेणीपासून कैलास व निएन चेन टांगला या श्रेण्या अलग केल्या आहेत. हिमालयाच्या उत्तरेस असलेले तिबेटचे पठार हे जगातील सर्वाधिक उंचीवरील विस्तृत पठार असून तेही ‘जगाचे छप्पर’ म्हणून ओळखले जाते. सदैव बर्फाच्छादित असलेले मौंट कैलास (६,७१४ मी.) हे प्रसिद्ध शिखर तिबेटमध्ये आहे. ते हिंदू व बौद्ध धर्मीयांचे पवित्र ठिकाण आहे. भाविक लोक त्यांच्या देव-देवता आणि साधु-संतांचे वास्तव्य येथे असल्याचे मानतात. कैलास शिखरापासून जवळच पवित्र मानसरोवर आहे.
प्राचीन वाङ्मयातील हिमालय : हिमालय हा संस्कृत शब्द असून हिम म्हणजे बर्फ आणि आलय म्हणजे घर. यावरून बर्फाचे घर असलेला प्रदेश म्हणजे हिमालय अशी व्युत्पत्ती केली जाते. पूर्वीचे भूगोलज्ञ या श्रेणीचा इमाउस किंवा हिमाउस व हेमोदास असा उल्लेख करीत असत.यांपैकी इमाउस किंवा हिमाउस हे नाव गंगेच्या उगमाच्या पश्चिमेकडील हिमालयाच्या पश्चिमेकडील भागास, तर हेमोदास हे पूर्वेकडील भागासाठी वापरलेले असावे. संस्कृत हिमवत किंवा प्राकृत हेमोटा म्हणजे बर्फाळ, यावरून हेमोटस हा शब्द वापरलेला असावा.
संस्कृत ग्रंथांत या पर्वताला हिमवत, हिमवान, हिमाचल, हिमाद्री, हैमवत अशी नावे आहेत. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ऐतरेय ब्राह्मण याग्रंथांत त्याचा उल्लेख हिमवत व हिमवंत असा केलेला आहे. महाभारतात नेपाळच्या पश्चिमेकडील प्रदेशाला हिमवत प्रदेश असे नाव दिले असून त्यातून गंगा, यमुना व सतलज या नद्या वाहतात, असे म्हटले आहे.अर्जुन व बलरामाची यात्रा, भीम व दुर्योधन यांचे गदायुद्ध, पांडवांचेनिर्याण या घटना हिमालयातच घडल्याचे मानले जाते. गीतेत श्रीकृष्णानेस्वतःला ‘स्थावराणां हिमालयः’ असे म्हटले आहे. पुराणांत हिमालय हावर्षपर्वत किंवा मर्यादापर्वत असल्याचे सांगितले आहे. मार्कंडेय व कूर्म पुराणांत हिमालयाचे वर्णन आहे. कालिका पुराणात त्याला पर्वतांचाराजा म्हटले असून मत्स्य पुराणात हिमालयातील फल-पुष्प संपदेचे वर्णनआहे. महाकवी कालिदासाला हिमालयाने विशेष मोहिनी घातली होती.