हिमनदीचा वेग कमी असून सुध्दा खननकार्य घडून येते?
Answers
Answer:
answer
Explanation:
हिमनदी ही नदीसारखी पूर्णपणे द्रव स्वरूपात नसते. तर ती बहुतांशी स्थायू स्वरूपात असते. त्यामुळे नदी एवढा तिचा वेग नसतो. हिमनदीचा वेग कमी असतो. परंतु, बर्फाचे वस्तुमान हे पाण्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खननकार्य मोठ्या प्रमाणात करते. हिमनदीच्या खनन कार्यातून १)हिमगव्हर २)शुककूट ३)गिरिशृंग ४)’यू’ (U) आकाराची दरी ५)लोंबती दरी ६)मेषशिला ही भूरूपे तयार होतात. १)हिमगव्हर: हिमनदीच्या खननकार्यामुळे तयार होणारे हे भूरूप आहे. हे भूरूप नदीच्या उगम क्षेत्रात तयार होते. हिमवर्षाव झाल्यावर हिम पाण्यासारखे लगेचच वाहत नाही, तर ते साचत जाते, आणि त्याचे बर्फात रूपांतर होते. हिमाचे बर्फात रूपांतर होत असताना, पडलेल्या दाबामुळे तळाशी घर्षण होऊन काही बर्फाचे पाणी होते आणि ते उताराच्या दिशेने वाहू लागते. वितळलेल्या पाण्याने विदारण म्हणजे झीज होऊन तळाकडील भाग आणखी खोल होत जातो. अशा डोंगर तळाकडील खोलगट भागास हिमगव्हर असे म्हणतात. २)गिरिशृंग : एखाद्या सुट्या डोंगराच्या भागात डोंगराच्या सर्व दिशांकडील उतारांवर हिमगव्हर तयार होते. तर डोंगराचा वरचा म्हणजे शिखराकडील भाग शिंगासारखा दिसतो. अशा भूरुपाला गिरिशृंग असे म्हणतात. उदा. युरोप खंडातील इटली व स्वित्झर्लंड यांच्या सीमेवरील मॉटरहॉर्न हे गिरिशृंगाचे जगप्रसिद्ध उदाहरण आहे. ३) लोंबती दरी: मुख्य हिमनदीत तिला येऊन मिळणाऱ्या उपहिमनद्यांपेक्षा हिमाचे प्रमाण जास्त असते. मुख्य व उपहिमनद्यांचा संगम होताना त्यांच्या तळाच्या उंचीत फरक असला तरी दोनही प्रवाहातील बर्फाची उंची सारखी असते. बर्फ वितळल्यावर हा तळातील उंचीचा फरक दिसू लागतो. उपहिमनदीची दरी मुख्य हिमनदीच्या तळापेक्षा जास्त उंचीवर राहते. ती लोंबती असल्यासारखी वाटते. म्हणून तिला लोंबती दरी असे म्हणतात. 4) मेषशिला: हिमनदीच्या मार्गात असलेल्या खडकावरून जाताना हिमनदीच्या प्रवाहाच्या दिशेकडील खडकाचा भाग घर्षणामुळे गुळगुळीत बनतो. परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेकडील भागात वितळलेल्या पाण्याने झीज होऊन खडकाचे तुकडे सुटे होऊन तो भाग खडबडीत बनतो. म्हणजे खडकाचा एक भाग गुळगुळीत व एक भाग खडबडीत बनतो. त्या भूरूपास मेषशिला असे म्हणतात. ५)’यू’ (U) आकाराची दरी: डोंगरावरून हिम उताराच्या दिशेने वाहते. त्यामुळे डोंगर उतार तीव्र होतात. त्या हिमाचे संचयन दोन डोंगरांमधील पायथ्याकडील भागात होते. घर्षणामुळे पायथ्याकडील भाग खोलगट होऊन त्याला इंग्रजी ’U’ या अक्षरासारखा आकार प्राप्त होतो. त्यास ‘U’ आकाराची दरी असे म्हणतात. अशा तऱ्हेने हिमनदीच्या खनन कार्याने विविध भूरूपे तयार होतात.