हिमप्रदेशात राहणाऱ्या वरील सर्व प्राण्यांचे त्यांच्या त्वचेवरील लांब
व दाट केस, पांढरे किंवा चंदेरी रंग हे वैशिष्ट्य आहे. त्यांचा त्यांना काय
उपयोग होत असेल?
Answers
Answer:
I dnt come hindi
Answer:
1. सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण
<b>थोडे<b> <b>आठवा.<b>
सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते?
पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. काही वनस्पतींना विविधरंगी फुले आहेत. काही वनस्पती पाण्यात आढळतात, तर काही पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळवंटी प्रदेशात आढळतात. काही वनस्पती सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत, तर काही मात्र प्रचंड मोठ्या आकारांच्या आहेत. काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात. वनस्पतींसारखीच प्राण्यांमध्ये विविधता आहे. काही एकपेशीय तर काही बहुपेशीय, काही अपृष्ठवंशीय तर काही पृष्ठवंशीय; तसेच जलचर, भूचर, उभयचर, नभचर, सरपटणारे अशा कितीतरी प्रकारच्या प्राण्यांनी आपले जग भरले आहे. हे पाहून आपल्याला प्रश्न पडतो, की सजीवांमध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी ?
<b>सांगा<b> <b>पाहू!<b>
काश्मीर व राजस्थान या प्रदेशांत आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? त्यांमध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल?
काश्मीर सारख्या हिमप्रदेशात देवदार, पाईन असे सूचीपर्णी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात मात्र बाभूळ, निवडुंगासारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात, तसेच वाळवंटात आढळणारा उंट हा काश्मीरमध्ये आढळून येत नाही. असे का?
<b>अनुकूलन<b> (Adaptation)
प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला ‘अनुकूलन’ म्हणतात.
<b>करुन<b> <b>पहा<b>
तुमच्या परिसरातील नदी, ओढे, तलाव, सरोवर अशा जलाशयांना भेट द्या. जमिनीवरील व पाण्या तील वनस्पतींमध्ये काय फरक जाणवतो?
जलाशयामध्ये असणाऱ्या वनस्पतींपैकी काही वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजलेली असतात. त्यांची खोडे पाण्यात बुडालेली तर पाने, फुले पाण्यावर तरंगत असतात. काही वनस्पती तर मुळांसहित पाण्यावर तरंगतात. पाण्याच्या तळाशी पाहिले की तेथेही
काही वनस्पती दिसून येतात. कमळ, जलपर्णी अशा वनस्पतींचे देठ, मऊ, पोकळ व लवचीक असतात. बऱ्याचशा जलीय वनस्पतींच्या
पाने, खोडे या अवयवांवर मेणचट पदार्थांचा पातळ थर असतो.
काही वनस्पतींची पाने अरुंद, रिबिनीसारखी पातळ असतात. त्यामुळे या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकतात. खोड व पानांचे देठ यांमध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयोगी पडतात.
<b>जरा<b> <b>डोके<b> <b>चालवा.<b>
1. अळू, कमळाच्या पानांच्या पृष्ठभागांवरून पाणी का ओघळून जाते?
2. या वनस्पतींची पाने पाण्या मुळे सडून का जात नाहीत?
3. या वनस्पतींची मुळे आकाराने लहान व तंतुमय का असतात?
<b>वाळवंटी<b> <b>प्रदेशातील<b> <b>वनस्पतींमधील<b> <b>अनुकूलन<b> (Adaptation in desert plants )
एक निवडुंगाची व एक भरपूर पाने असणारी वनस्पती अशा दोन कुंड्या घ्या . दोन्ही कुंड्यां मधील वनस्पतींच्या पानांभोवती प्लॅस्टिकच्या पिशव्या सैलसर बांधून कुंड्या सकाळपासून उन्हात ठेवा. दुपारी त्या कुंड्या वर्गात आणून निरीक्षण करा.
दोन्ही पिशव्यांतील पाण्याचे प्रमाण सारखे दिसते का?
वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते. या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते त्यामुळे ते मांसल बनते. पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते, म्हणून ती हिरवी असतात. या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात. या वनस्पतींच्या खोडावरदेखील मेणचट पदार्थांचा जाड थर असतो.
हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होतो?
हिमप्रदेशामधील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने देवदार, पाईन अशा सूचिपर्णी वृक्षांचा समावेश होतो. त्यांचा आकार शंकूसारखा असतो.
फांद्यांची रचना उतरती असते. या प्रदेशांमध्ये खूप हिमवृष्टी होते तसेच थंडीही खूप असते. शंकूच्या आकारामुळे या वनस्पतींवर बर्फ साचून राहात नाही, तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरू शकतात.
● जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन (Adaptation in forest plants )
या प्रदेशात वृक्ष, झुडूप, रोपटे असे विविध प्रकार आढळतात. सूर्य प्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतींमध्ये स्पर्धा असते. जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात तसेच त्यांच्या आधाराने वेलीही उंच वाढतात. काही वेलींच्या खोडांवर असणारे तणाव
म्हणजे खोडांचे अनुकूलनच होय.
●गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन (Adaptation in grassland plants)
गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात. हे गवत तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप थांबवते. विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे गवत खूप उंच असते. त्या मध्ये वाघ, सिंह, हत्ती , हरिण असे प्राणी लपून राहू शकतात; तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुजे असते, त्या मुळे यात सशासारखे प्राणी आढळतात. डोंगरउतारावर, पठारी व मैदानी प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात बटाटा, भुईमूग, सुरण, जलपर्णी, कोरफड, बाभूळ, गाजर, कांदा, बीट, कारले, द्राक्ष वेल तसेच तुमच्या सभोवताली
असणाऱ्या वनस्पतींच्या कोणत्या अवयवांत अनुकूलन झालेले आहे, ते निरीक्षणाने लिहा.
hope it's helpful to you ✌️✌️✌️