होमरूल चळवळ कोणी सुरु केली?
Answers
Answered by
4
Answer:
होमरुल चळवळ ही ब्रिटनमध्ये आयरिश गृह राज्य चळवळ व इतर चळवळीच्या शोधांसाठी एक चळवळ होती. त्यावेळी आयर्लंडमध्ये होमरुल चळवळ जोरात चालली होती, मग अशा प्रकारची चळवळ भारतात का होऊ नये अशी कल्पना १९१५ साली डॉ.ॲनी बेझंट यांनी मांडली. पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली, तर त्याच वर्षी (१९१६) अड्यार (मद्रास) येथे डॉ.ॲनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. १९१६ ते १९१८ पर्यंत सुमारे दोन वर्ष ही चळवळ सुरू राहिली. टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड होते. होमरूल चळवळीसाठी उर्वरित भारत हा डॉ.ॲनी बेझंट यांच्याकडे सोपवण्यात आला होता
Similar questions