हैराण करणे वाक्यात उपयोग करा
Answers
Answer:
हैराण करणे - त्रास देणे
वाक्य: लहान मुले पालकांना खूप हैराण करतात.
Answer:
हैराण करणे म्हणजे जिकरीस आणणे किंवा त्रास देणे.
Explanation:
वाक्यप्रचार:
जेव्हा एखादा विशेष शब्दसमूहाचा एक वेगळा अर्थ निघतो त्याला वाक्प्रचार असे म्हणतात.
ज्यावेळी एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीमुळे त्रासून जातो किंवा कंटाळून जातो त्याला हैराण करणे असे म्हणतात.
उदाहरणार्थ-
१. सतत रात्रंदिवस काम काम सांगून राजेशला हैरान करण्यात आले.
२. जास्तीत जास्त काम सांगून कमीत कमी मोबदला देऊन श्रीमंत लोक गरिबांना हैराण करतात.
३. सुमितने रडून-रडून त्याच्या आई-वडिलांना हैराण करून टाकले.
४. मला या वाढदिवसाला काय उपहार देणार हे विचारून विचारून मुलाने वडिलांना हैराण करून टाकले.
५. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी भारतीय जनतेला हैराण करून टाकले होते.
वरील विधानांवरून असे स्पष्ट होते की ज्यावेळेस एखादी गोष्ट करून किंवा ऐकून व्यक्ती जिकरीस येतो, त्याला हैराण करणे असे म्हणतात.