Hindi, asked by sw339031, 4 months ago

हिरकणी गडावर कशासाठी गेली होती?
हिरकणीचे गाव कोठे होते?​

Answers

Answered by delania5610
2

Answer:

मराठी साम्राज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडवरील प्रसिद्ध हिरकणी बुरुजाची सत्यकथा

स्वराज्यात घडलेली किल्ले रायगडावरील 'गौरवकथा' येथे आवर्जून व्यक्त करावीशी वाटते. कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने रायगडावर दुध विकण्यासाठी अनेक गौळणी आल्या होत्या. त्यांत गडाखालील वाळूसरे गावची हिरा नावाची एक गौळण होती. मुदपाकखान्यात साऱ्या गौळणींनी दुध घातले. दुधाचे पैसे घेतले. साऱ्या गौळणी परत जाण्यास निघाल्या. पण रायगडावरील वैभव पाहण्यात हिरा रमली. राजवाडा, उंचच-उंच कमानी, दरवाजे, हत्तीखाना, घोडे, अंबरखाना, नगारखाना, जगदीश्वर राऊळ, ऐश्वर्याने झगमगलेली बाजारपेठ, तलाव, चबुतरे, भरजरी वस्त्र परिधान केलेली लोकं पाहता पाहता थक्क झालेल्या हिराला दिवस कधी मावळतीला गेला हे समजलेच नाही. तोफेच्या आवाजाने भानावर आलेली हिरा महादरवाजाकडे धावत निघाली. पण बघते तर काय ? महादरवाजाला कड्या-कुलपं लागली होती. गडावरून खाली उतरण्यासाठीची ही एकमेव वाट आणि त्यावरचा दरवाजाच आता बंद झाला होता. काय करावे काही समजेना. हिराने दरवाजा उघडण्याची किल्लेदाराला विनंती केली. पण किल्लेदाराने साफ नकार दिला. हिरा रडू लागली.

स्वराज्यातील गडांचे दरवाजे सायंकाळी सूर्यास्तानंतर बंद होत. ते दरवाजे सकाळी सुर्योदयालाच उघडले जात. राजांनी तसा तो नियमच घालून दिला होता. कुठल्याही परिस्थितीत सूर्योदयापूर्वी दरवाजा उघडण्याची अनुमती नसे. जर उघडलाच तर ती राजांची अनुज्ञा मानली जात असे. नियम सर्वांना सारखेच होते.

किल्लेदाराने हिराची समजूत घातली, “गड राजांचा आहे. येथे तुमची राहण्याची, खाण्या-पिण्याची सर्व काळजी घेतली जाईल. सूर्योदयाबरोबर दरवाजे उघडताच तुम्ही तुमच्या घरास परत जा.”

पण पुत्रवियोगाने व्याकूळ झालेली हिरा गडावरून कुठल्याही परिस्थितीत खाली उतरून जाण्यासाठी हरणीसारखी वाट शोधत गडावर भिरभिरत होती. त्याचवेळी गडाच्या मावळतीला पश्चिम दिशेला असलेल्या कड्यावर येऊन हिरा उभी राहिली. कडा अगदी ताशीव आणि खोल होता. कड्यावरून खोल दरित तिला आपले गाव दिसत होते. हिरा कड्यावरून खाली उतरू लागली. मातृवात्सल्याने प्रेरित झालेली हिरा कडा कधी उतरून गेली हे तिलाही समजले नाही. खरचटल्या अंगाने जंगल पार करत हिरा सुखरूप आपल्या घरी पोहोचली.

दुसऱ्या दिवशी राजांना ही वार्ता समजली. राजांनी हिराला गडावर बोलावून घेतले. हिराने आपल्या बाळासाठी स्वराज्याचा नियम मोडला होता. राजे आता काय शिक्षा फर्मावतील याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु राजांनी हिराला चोळी, बांगडी, वस्त्रालंकार देऊन तिच्या ध्येर्याचा, धाडसाचा आणि मातृवात्सल्याचा गौरवच केला.

"ज्या वाटेने हिरा खाली उतरली त्या वाटेवर शत्रूचा संभाव्य धोका ओळखून राजांनी आपल्या बांधकाम अभियंत्यांना, हिरोजी इंदलकरांना त्या वाटेवर लगेच बुरुज बांधण्याची आज्ञा केली. या बांधलेल्या बुरुजाला ‘हिरकणी बुरुज’ असे नाव देऊन राजांनी त्या आईची कहाणी अजरामर केली. स्त्री शक्तीचा असा आगळा वेगळा सन्मान करावा तो फक्त राजियांनीच."

Explanation:

hope you got your answer plz mark me as brainliest its a humble request

Similar questions