हातभार लावणे : अर्थ-
वाक्य-
वाटप करणे : अर्थ--
वाक्य-
Answers
Answer:
१ ) मदत करणे
Explanation:
hope it helps you
Answer:
हातभार लावणे- सहकार्य करणे किंवा मदत करणे.
रमेश घर चालवण्यासाठी आपल्या आई-वडिलांना नेहमी हातभार लावतो.
वाटप करणे- वितरण करणे.
आज शाळेत सर्व विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले
Explanation:
हातभार लावणे म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामात मदत करणे. काम करत असताना ते काम पूर्ण करण्यासाठी कुणाचीही मदत झाली तर त्याला आपण हातभार लागला असे म्हणतो. उदाहरणार्थ रामसेतू बनवताना खारीने केलेल्या छोट्याशा मदतीने ही प्रभू रामांच्या कार्याला हातभार लागला.
दुसरा वाक्यात वाटप करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे वितरण करणे. ज्यावेळी एखादी गोष्ट ही अनेक व्यक्तींमध्ये वितरित केली जाते किंवा त्याचे विभाजन केले जाते त्याला वाटप करणे असे म्हणतात.
उदाहरणार्थ. शिक्षकांनी गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. म्हणजे शिक्षकांनी गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण केले.