हिंदू धर्म कसा बनला?
कृपया सर्वांनी मराठीतच उत्तर द्या,सगळ्यांनी उत्तरच द्या उगाच वेळ फुकट घालवू नका!जो कोणी योग्य उत्तर देईल त्याला मी brainlist बनवेल व like ans देखील करेन.
धन्यवाद!!
Answers
Answer:
हिन्दू धर्म (संस्कृत: सनातन धर्म) एक धर्म (या, जीवन पद्धति) है जिसके अनुयायी अधिकांशतः भारत ,नेपाल और मॉरिशस में बहुमत में हैं। इसे विश्व का प्राचीनतम धर्म माना जाता है। इसे 'वैदिक सनातन वर्णाश्रम धर्म' भी कहते हैं जिसका अर्थ है कि इसकी उत्पत्ति मानव की उत्पत्ति से भी पहले से है।
Step-by-step explanation:
please mark me in brainly and follow me
Step-by-step explanation:
हिंदू शब्दाची व्युत्पत्ती :
धर्माची सुरुवात सिंधू नदीच्या पलीकडील भारत देशात झाली. आणि बाहेरील देशातील लोक सिंधू नदीच्या पलीकडे लोक म्हणून ओळखत. पर्शियन लोक सिंधूचा उच्चार हिंदू असा करीत; कारण पर्शियन भाषेतील 'स' ह्या अक्षराचा अभाव. असे एक मत आहे. तर काही विद्वानांचा मते , हिंदू हा शब्द सिंधू शब्दांपेक्षाही प्राचीन आहे. ऋग्वेदातील बृहस्पती आगम ह्या भागातील श्लोकात खालील प्रमाणे उल्लेख आढळतो-
हिमालयं समारभ्य यावद् इन्दुसरोवरं ।
हिमालयं समारभ्य यावद् इन्दुसरोवरं ।तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ।।
याचा अर्थ असा की , हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेला हा भूभाग व देवतांनी निर्मिलेला हा देश हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो.मेरुतंत्र ह्या शैवग्रंथात हिंदू शब्दाची व्याख्या अशी आहे-
हीनं च दूष्यत्येव हिन्दुरित्युच्यते प्रिये।
याचा अर्थ असा की , जो हीनता आणि अज्ञानतेचा त्याग करतो तो हिंदू.
तर माधवदिग्विजय या ग्रंथात असे आहे-
ओंकारमंत्रमूलाढ्य पुनर्जन्म दृढाशयः ।
ओंकारमंत्रमूलाढ्य पुनर्जन्म दृढाशयः ।गोभक्तो भारतगुरूर्हिन्दुर्हिंसनदूषकः ।।
अर्थात , जो ओमकार नाद करतो, कर्मावर विश्वास ठेवतो, गोभक्ती करतो आणि हिंसेचे निर्दालन करतो तो हिंदू .
इतिहास :
हिंदू धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्म मानला जातो .परंतु यावर विद्वानांची अनेक मते आहेत.
द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया ह्या पुस्तकात जेम्स मिल ह्याने भारताच्या इतिहासाचे हिंदू, मुस्लिम आणि ब्रिटिश वसाहत असे संकुचित वर्गीकरण केले होते. ह्या वर्गीकरणामुळे पसरलेल्या गैरसमजुतीमुळे हे वर्गीकरण टीकेस पात्र ठरले. याव्यतिरिक्त हिंदू धर्माचे काळानुसार अजून एक वर्गीकरण आहे. ते असे " प्राचीन, शास्त्रीय, मध्ययुगीन आणि आधुनिक. " याचा विस्तार पुढील प्रमाणे-
भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नांदणाऱ्या वैविध्यपूर्ण पंथांना, संप्रदायांना, समाजांना आणि जीवन पद्धतींना एकत्रितपणे हिंदू धर्म असे संबोधले जाते. हजारो वर्षांच्या काळात या समाजाने एक संस्कृती, जीवनदृष्टी व त्यावर आधारित एक जीवनपद्धती निर्माण केली. हिंदुत्व ही संकल्पना जीवनाकडे पहाण्याचा एक दृष्टिकोन आहे.. निसर्गातील चर, अचर आणि अनेकविध श्रद्धा, संकल्पना आणि मूल्यांच्या पूजांची परम्परा हीसुद्धा या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या सम्पूर्ण संस्कृतीस हिंदू धर्म असे नाव मिळाले.