Social Sciences, asked by shreelabaroi8571, 1 year ago

हैदराबाद मुक्ति संग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा.

Answers

Answered by brainlistgirl107
3

Explanation:

स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) (ऑक्टोबर ३, १९०३ हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले. [१]

माहितीचौकट चळवळ चारित्र

जन्म:

ऑक्टोबर ३, १९०३

सिंदगी, विजापूर

मृत्यू:

जानेवारी २२, १९७२

हैद्राबाद

चळवळ:

हैदराबाद मुक्तिसंग्राम

पत्रकारिता/ लेखन:

व्हिजन साप्ताहिक

धर्म:

हिंदू

वडील:

भगवानराव खेडगीकर

हैदराबाद मुक्तिसंग्रामातिल मराठवाड्याचे योगदान

हैदराबाद येथील निजामाचा सेनापती कासीम रझवी याच्या ‘रझाकार’ या संघटनेने मराठवाडा जनतेवर अत्याचार सुरू केले होते. याचा विरोध करणे आवश्यक झाले होते. यासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र परिषदेचे चिटणीस म्हणून स्वामी काम पाहत होते. यासाठीची चळवळ अनेक वर्षे चालली होती. २७ ऑक्टोबर, १९३८ रोजी स्वामी रामानंद सत्याग्रहासाठी कार्यकर्त्यांसह हैदराबाद शहरातील राजमार्गावर आले. त्यांना अटक झाली होती. ते सुमारे चार महिने कारावासात होते. सुटका होताच स्वामीजींनी भूमिगतपणे काम केले.

‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करून लोकशाही मान्य करा व संस्थानाचे स्वतंत्र अस्तित्व संपवा’ अशी हाक रामानंद तीर्थ यांनी सरकार आणि जनतेला दिली. याचा परिणाम होऊन लोक या संग्रामात सामील झाले. मुक्तिसंग्रामात आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ’व्हिजन’ हे साप्ताहिक चालवले होते. यामार्फत ते भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रचार करत. माणिकराव पहाडे, शंकरभाई पटेल, बाबासाहेब परांजपे. गोविंदभाई श्रॉफ हे तरुण स्वातंत्र्यसैनिक होते. हैदराबाद मुक्तिसंग्राम चळवळीत स्वामी रामानंद तीर्थ यांचे ते प्रमुख समर्थक होते.

तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी सशस्त्र पोलीस कारवाई करून निजामाला शरण आणले. हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतात विलीन झाले.

लोकसभेच्या लागोपाठच्या दोन निवडणुकांत गुलबर्गा व औरंगाबाद येथून रामानंद तीर्थ हे निवडून गेले होते. १९७२ साली त्यांचे हैदराबाद येथे निधन झाले.

Answered by marishthangaraj
0

स्वामी रामानंद तीर्थ यांचे:

  • तपस्वी स्वामी रामानंद तीर्थ हे हैदराबाद मुक्तिसंग्रामातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. विजापूरच्या परिसरात सिंदगी येथे त्यांचा जन्म झाला.
  • त्यांचे शिक्षण सोलापूरच्या शासकीय संस्थेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा गावात ते एका गुरुकुलात नोकरीला होते.
  • इ.स. 1930 मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी त्यांना दीक्षा दिली आणि नंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ हे नाव घेतले.
  • अंबेजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयाचा जीर्णोद्धार त्यांनी केला.

योगदान:

  • हैदराबादमधील निजामाचा सेनापती कासिम रझावीची मराठवाड्यातील "रझाकार" संघटना |
  • जनतेवर अत्याचार झाले. त्याचा प्रतिकार करणे गरजेचे होते. स्वामी महाराष्ट्र परिषदेचे सचिव म्हणून यात योगदान देत होते. हा प्रदीर्घ आंदोलनाचा विषय आहे.

#SPJ2

Similar questions