History, asked by nitinreddykonda6210, 1 year ago

हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सागा.​

Answers

Answered by bestanswers
9

हडप्पा संस्कृतीचा शोध सिंधू नदीच्या खोऱ्यात लागला. या संस्कृतीची स्थापना नक्की कोणी आणि कधी केली याविषयी माहिती उपलब्ध नाही पण या संस्कृतीची वैशिष्ट्ये तिच्या अवशेषातून पाहायला आणि अभ्यासायला मिळतात.  

  • अतिशय नियोजनबद्ध शहरे आणि घरे  
  • सांडपाणी आणि गटारे यांची उत्कृष्ट व्यवस्था.  
  • अन्नधान्य साठवणीसाठी निर्माण केलेली गोदामे.  
  • दगड आणि ब्राँझ धातू पासून बनवलेली शेतीची अवजारे  
  • शहराभोवती उभारलेल्या तटरक्षक भिंती  
  • विविध प्रकारची नाणी  
  • व्यापारासाठी बांधलेली जहाजे, बैलगाड्या.  
  • स्त्रियांना समाजात मानाचे स्थान  
  • विविध प्रकारचे दागदागिने.  

अशा प्रकारे हडप्पा संस्कृती ही अनेकांगाने समृद्ध असल्याचे पुरावे मिळाले आहेत आणि तीच त्या संस्कृतीची वैशिष्टये आहेत.

Similar questions