History, asked by premwaghmare825194, 3 months ago

हडप्पा संस्कृती म्हणजे काय?​

Answers

Answered by revatipatildi
2

Explanation:

definition :- हडप्पा संस्कृती (इंग्रजी: Harappan civilization) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात.

नगररचना :- हडप्पा संस्कृतीची नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. घरे, तटबंदी, सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृहे, धान्याची कोठारे,जहाजाची गोदी इत्यादी घटक पाहता हडप्पाकालीन संस्कृतीच्या प्रगत स्थापत्याची कल्पना येते.

घरे :- हडप्पा संस्कृतीत प्रत्येक प्रभागात २० ते ३० घरे असत. ती पक्क्या विटांची असून प्रशस्त होती. प्रत्येक घरामध्ये स्नानगृह(बाथरूम) असे. काही घरांच्या परसात विहिरी आढळल्या आहेत. घरांच्या मध्यभागी, जसे आजही वाड्यांच्या व इतर भारतातील पारंपरिक घरांमध्ये असते.

आर्थिक व्यवस्था :- व्यापारासाठी उपयुक्त वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन - उदाहरणार्थ,सुबक मातीची भांडी,सोने, चांदी,तांबे आणि कांसे या धातूंच्या वस्तू,सौंदर्यपूर्ण वस्तू,मूर्ती इत्यादी. उत्पादनाच्या सोईसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तींचा स्वतंत्र विभाग .अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार. शासकीय यंत्रणेच्या साहाय्याने व्यापारावर नियंत्रण असे.

आहार :- तेथील लोकांचा प्रमुख आहार गहू होता. त्याचबरोबर जवस, तीळ, वाटाणा, यासारखी दुय्यम धान्ये सुद्धा पिकवीत असत. खजुराचा उपयोगही ते अन्न म्हणून करीत असत. येथील लोक पशू बाळगीत त्यामुळे दूधदुभत्यांचा पुरवठा त्यांच्याकडे होत असावा. तसेच मांसाहारही केला जात असे.

घरगुती कामे :- कुंभाराच्या चाकावर बनवलेली सुंदर मातीची भांडी येथे आढळली. त्यांवर नक्षीकाम केलेले होते. याशिवाय तांबे, ब्रांझ आणि चांदीची भांडी सापडली, परंतु याचे प्रमाण मात्र अत्यल्प होते.

समाजरचना :- हडप्पा संस्कृतीत कुटुंबसंस्था महत्त्वाची होती. नगररचनेच्या अवशेषांवरून समाजात राज्यकर्त्यांचा वर्ग, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचा वर्ग असल्याचे दिसते. नद्यांच्या काठी सुपीक प्रदेशात ही संस्कृती विकसित झालेली असल्याने शेती हा समाज जीवनाचा कणा होता.

Answered by Anonymous
3

Answer:

what r u saying

Explanation:

do u know what u have written

Similar questions