हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा
Answers
Answer:
लिली हार्ले ही एक मोठी कलावंत होती. गायन, पियानो वादन, नर्तन यांत ती निष्णात होती. कलावंत म्हणून जे मोठेपण असते, ते तिने मिळवले होते. या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसा, कीर्ती मिळवली होती. हे सर्व एके दिवशी अचानक लुप्त झाले. तिचा आवाज हरवला आणि तिचे सर्वस्वच गेले. ती रात्र तिच्या दृष्टीने काळरात्र होती. दुःखाचा कडेलोट होता.त्याच रात्री लिलीचा पाच वर्षांचा हरहुन्नरी मुलगा या संकटात तिच्या मदतीला धावून आला. कोसळलेला कार्यक्रम त्याने पुन्हा उभारला. त्याने गायन, अभिनय व नर्तन या कौशल्यांचे डोळे दिपवणारे दर्शन घडवले. कोणत्याही आईला आभाळ ठेंगणे वाटावे, असे दृश्य होते ते. नवा कलावंत उदयाला आला. आपल्या मुलाचा हा उदयकाळ म्हणजे सुखाचा सर्वोच्च बिंदू होता. एका बाजूला सुख होते. त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला दु:ख होते. म्हणून या पाठाचे शीर्षक आहे – ‘हसरे दुःख’.