हत्ती,कासव,नदी गोष्ट
Answers
Explanation:
hatti kasab aani nadi gosht
Answer:
खरा मित्र -
एकदा एका जंगलात एक हत्ती राहत होता. जंगल खूप घनदाट होते. जंगलात खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती. रंगीबेरंगी फुलांची उधळण होती. अगदी नयनरम्य असे दृश्य त्या जंगलाचे होते.
जंगलात खूप सारे प्राणी, पक्षी, राहत होते पण हत्तीला मात्र कुणीही मित्र नव्हता. तो एकटाच जंगलात फिरत असे जंगलाच्या बाजूला एक भली मोठी नदी वाहत असे. नदीचे पाणी सुंदर, नितळ व स्वच्छ होते. सूर्याची किरणे पाण्यावर पडताच पाणी चकाकून दिसत असे. त्या नदीमध्ये एक कासव राहत होते. ते रोज नदीच्या किनारी येऊन बसत असे.
एकदा हत्ती पाणी पिण्यासाठी नदीजवळ गेला पाणी पीत असताना त्याचे लक्ष कासवा कडे गेले. हत्तीने कासवाला विचारले कासव दादा तुम्ही इथे का बसले आहात. तेव्हा कासवाने उत्तर दिले मी रोज या नदीच्या किनारी विश्रांती करण्यासाठी बसलेला असतो. थोडा वेळ बसतो व परत पाण्यात निघून जातो. मला कोणी मित्र नाही हे ऐकून हत्तीला आनंद झाला त्याने कासवाला विचारले तू माझा मित्र होशील कासवाने उत्तर दिले हो! का नाही आपण दोघे मित्र झालो तर आपण खूप मज्जा करू असे हत्ती कासवाला सांगत होता.
हत्ती रोज कासवाला आपल्या पाठीवर बसवून जंगलाची सैर करण्यास नेत असे. हत्ती आणि कासवाचा रोजचा हा दिनक्रम असायचा. नदी जवळ आल्यावर सुद्धा ते पाण्यामध्ये भरपूर वेळ खेळायचे.
एक दिवस अचानक हत्ती आजारी पडला. त्यामुळे तो कासवाला भेटायला जाऊ शकला नाही. कासव नदीवर हत्तीची वाट पाहत होते. त्याला माहीत नव्हते हत्ती आजारी आहे. कासवाने पूर्ण दिवस हत्ती ची वाट बघितली पण हत्ती आलाच नाही कासव परत पाण्यात निघून गेले. दुसऱ्या दिवशी कासव नदीकिनारी बसून हत्तीची वाट पाहू लागले कासव विचारात पडला हत्ती मला भेटायला का येत नसेल? काय झाले असेल याची त्याला खंत वाटू लागली. म्हणून कासवाने ठरवले मला हत्तीला भेटायला गेले पाहिजे. नेमके माझ्या मित्रासोबत काय झाले असेल? कासव हळुहळु त्याच्या पावलांनी हत्तीला भेटायला जंगलात निघाला. चालता चालता शेवटी कासव हत्तीच्या जवळ जाऊन पोहोचला. त्याने बघितले हत्ती आजारी अवस्थेत पडलेला होता. कासवाला ते बघून फार वाईट वाटले. त्याने लगेच जंगलातील काही औषधी वनस्पती हत्तीला खायला घातली.
पूर्ण दिवस कासवाने हत्तीची काळजी घेतली. नंतर हळूहळू हत्तीला बरे वाटायला लागले. हत्ती कासवाला सांगायला लागला धन्यवाद मित्रा तू नसता तर माझी काळजी कोणी घेतली असती. माहित नाही तू माझा खरा मित्र आहेस हत्ती बरा झाल्यानंतर दोघेही जंगलात पुन्हा फिरायला लागले.