Hindi, asked by Anonymous, 5 hours ago

हत्ती, कासव, नदी, गोष्ट तयार करणे मराठीत .​

Answers

Answered by Qwrome
0

एका गावात एक शिंपी राहत होता.

लोकांचे कापडे शिवणं त्याचा व्यवसाय होता. त्या गावात एक हत्तीचे पिलू देखील ये- जा करत होते. गावकर्‍यांनी जणू त्या हत्तीच्या पिलाला पाळलेच होते. ते त्याला खायला द्यायचे.

तो देखील गावकर्‍यांशी माणसाळला होता.

हत्तीचे पिलू त्या शिंप्याचे फार आवडीचे होते.

दोघांची चांगली गट्टी जमली होती.

त्या गावात एक देऊळ होत.

दररोज तो हत्ती डोलत डोलत त्या शिंपीकडे यायचा, तो शिंपी त्याला फुले द्यायचा आणि ते फुले घेऊन तो हत्ती त्या देऊळात जाऊन देवाला व्हायचा.

हा असा दररोजचा नित्यक्रम होता.

लोक मोठ्या कौतुकाने हत्तीची देवावरची भक्ती बघायचे.

तो शिंपी कडे यायचा आणि फुले घेऊन परत जायचा.

एके दिवशी तो शिंपी फार तणावात असतो.

दिल्या वेळेत काम पूर्ण केले नाही म्हणून त्याचे भांडण एका ग्राहकाशी झालेले असते.

त्यामुळे तो फार संतापलेला असतो.

ठरलेल्या प्रमाणे तो हत्ती त्या शिंप्या कडे येतो आणि फुले घेण्यासाठी आपली सोंड शिंप्या जवळ करतो. संतापलेला शिंपी हत्तीला फुले देण्यावजी त्याचा सोंडेला सुई टोचतो आणि आपला राग त्या हत्तीवर काढतो.

जोरात सुई टोचल्यामुळे हत्तीला फार वाईट वाटतं तो त्यावेळी तर काही करत नाही पण आतून तो फार दुखावलेला असतो.

आपल्याला दिलेली वागणुकीचा धडा शिंप्याला कसा शिकवायचा ह्याचा विचार करत असतो.

त्याला देखील शिंप्याचा फार राग आलेला असतो.

तो स्वतःचा राग शांत करण्यासाठी गावच्या जवळ एक वाहणाऱ्या ओढ्यामध्ये जाऊन लोळ लोळ लोळतो त्याचे पाणी अंगावर घेऊन आपला राग शांत करतो आणि त्या ओढ्यातले पाणी चिखला सकट आपल्या सोंडेत भरून गावाच्या दिशेने शिंप्याकडे निघतो.

शिंपी आपले काम करत असतो.

काहीही न बोलता तो हत्ती त्या शिंप्यावर आणलेले घाण पाणी टाकतो. त्याचे सगळे कपडे आणि दुकानाचे सामान खराब होतं.

त्याला स्वतःची केलेली चूक लक्षात येते.

पण आता पश्चात्ताप करून काय होणार.

त्याला त्याचा चुकीसाठी चांगलीच शिक्षा मोजावी लागली होती.

#SPJ3

Similar questions
Science, 3 hours ago