Hindi, asked by saicharan2663, 6 months ago

HATTA VAKYAPRACHAR MEANING

Answers

Answered by agrawaldrishti
1

Explanation:

सर्वस्व पणाला लावणे : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे

▪ साखर पेरणे : गोड गोड बोलून आपलेसे करणे

▪ सामोरे जाणे : निधड्या छातीने संकटास तोंड देणे

▪ साक्षर होणे : लिहिता-वाचता येणे

▪ साक्षात्कार होणे : आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे

▪ हस्तगत करणे : ताब्यात घेणे

▪ सोन्याचे दिवस येणे : अतिशय चांगले दिवस येणे

▪ सूतोवाच करणे : पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे

▪ संधान बांधने : जवळीक निर्माण करणे

▪ संभ्रमात पडणे : गोंधळात पाडणे

▪ स्वप्न भंगणे : मनातील विचार कृतीत न येणे

▪ स्वर्ग दोन बोटे उरणे : आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे

▪ हट्टाला पेटणे : मुळीच हट्ट न सोडणे

▪ हमरीतुमरीवर येणे : जोराने भांडू लागणे

▪ हरभऱ्याच्या झाडावर चढणे : खोटी स्तुती करून मोठेपणा देणे

मराठीतील म्हणी आणि त्यांचे अर्थ

आपलेच दात आपलेच ओठ आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

आपल्याच पोळीवर तूप ओढणे फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.

आयजीच्या जीवावर बायजी उदार दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.

आयत्या बिळावर नागोबा एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.

आलिया भोगासी असावे सादर तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.

आवळा देऊन कोहळा काढणे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.

इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.

इच्छा परा ते येई घरा आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.

इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.

इन मीन साडेतीन एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.

ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.

उंदराला मांजर साक्ष ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे.

उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले फायद्याची वेळी येणे; पण लाभ न घेता येणे.

उकराल माती तर पिकतील मोती मशागत केल्यास चांगले पीक येते.

उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.

उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती? जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.

उचलली जीभ लावली टाळ्याला दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे

उठता लाथ बसता बुक्की प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हापुन्हा शिक्षा करणे.

Similar questions