हवामान बदलाचे परिनाम स्पष्ट करा
Answers
Answer:
पृथ्वीवर होत असलेल्या हवामान बदलाचे स्पष्ट परिणाम भारतात जाणवू लागले आहेत.
Answer:
पृथ्वीभोवती असलेल्या हवेला विशिष्ट दाब असतो. तो मिलीबार किंवा हेप्टापास्कलमध्ये मोजला जातो. वातावरणात सूर्यप्रकाशाची किरणे पडताच पृथ्वीचे तापमान वाढण्यास सुरवात होते. पृथ्वीच्या जवळचे हवेचे थर तापतात आणि त्यावरील थर थंड असतात, त्यामुळे तेथे हवेचा दाब जास्त असतो. नैसर्गिकपणे हवा वरून खाली वाहते; मात्र त्या थरात काही उंचीवर थंड हवा असल्याने ती हवा पुन्हा आणखी खालच्या दिशेने वाहते. यालाच "एअर इन्व्हर्जन' म्हणतात. त्यातून धुळीचे कण मोठ्या प्रमाणात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या थरात येऊन लोंबकळत राहतात. राजस्थान, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेशात हवेचा दाब कमी झालेला होता, त्यामुळे आखाती प्रदेशाकडून हवेबरोबर वाहत येणारे धुळीचे कण हवेत तरंगत राहिले.
मुंबईभोवती हवेचा दाब 1010 हेप्टापास्कल होता; तर मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशकडे तो 1012 हेप्टापास्कल होता. त्यामुळे हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत राहिली. या भागात धुळीचे कण मोठ्या प्रमाणात जमा झाले. राजस्थानात मार्च महिन्यात अशी धुळीची वादळे सतत होत असतात. त्याचा प्रभाव आजपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रापर्यंत होत नव्हता. धुळीसोबत हवेतील बाष्पही लोंबकळत राहिल्याने "हेज'चे वातावरण अनुभवण्यास मिळाले. ते दिवसभर टिकून राहिले.
21 मार्चला सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यापुढे त्याचा प्रवास उत्तर गोलार्धाच्या दिशेने म्हणजेच कर्कवृत्ताच्या दिशेने होतो. त्या दिवशी मार्च महिन्यातील किमान तापमानाची नोंद झाली. धुळीमुळे पिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढेल, तसेच मानवामध्ये श्वसनाचे आजार, स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढणे, फुफ्फुसाचे आजार आणि अस्थमिक विकार वाढू शकतात. मार्च महिन्यात अशा प्रकारे दूषित हवामान होण्याचे हे पहिलेच उदाहरण असावे.