English, asked by Vaishnavimewati, 8 months ago

( Hello friends good morning
plz help )

Mahatma gandhi ani swachata essay in marathi ( Word limit 300)


plzzzz help me

Answers

Answered by Anonymous
5

गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या

महात्माजींची जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला.

१८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला. तेथेच त्यांनी १९०३ मध्ये इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली. १९१४ मध्ये ते भारतात परतले.

१९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. १९१७ मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, १९३०-३२ दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, १९४०-४२ दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सार्‍यात महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले.

९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे सहा मे १९४४ ला त्यांना सोडणअयात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर पंधरा ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यावेळी हा महात्मा नोआखालीत सुरू असेलली जातीय दंगल विझवण्यासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणार्‍या महात्मा गांधींना एका असंतुष्टाने तीस जानेवारी १९४८ मध्ये गोळी घातली. त्यातच त्यांचे निधन झाले.

महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे.

इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे... व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो. ती आतील शक्ती प्रेरणा देत असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले.

त्यांनी सुरू केलेल्या 'हरीजन' वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे होता. सामाजिक सुधारणा, शिक्षणपर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम, रणनीती यांचेही विवरण असायचे.

प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते, असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता. यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल.

please follow me and give thanks to my answer

Answered by siyatomar64
2

सरकारने स्वच्छतागृहांच्या निर्मितीचा व्यापक कार्यक्रम राबवला तर त्यातून लाखो-करोडो बायकांचे जीवन झाले तर थोडे सुकर होईल. परंतु भारतातील शासन व्यवहारांचे कळीचे दुखणे म्हणजे या व्यवहारांमध्ये सातत्य नाही. स्वच्छतेच्या प्रश्नाशी निगडित असणाऱ्या व्यवस्थात्मक-शोषणात्मक आयामांची प्रस्थापितांना जाणीव करून देण्यासाठी गांधींनी स्वत:च स्वच्छता करण्याचा मार्ग स्वीकारला आणि इतरांनाही स्वच्छतेचा-अंगमेहनतीचा सल्ला दिला.

पुलंच्या जमान्यातल्या अतिविशाल महिला मंडळांपासून तर सत्तरच्या दशकातल्या तारे-तारकांच्या समाजसेवेच्या तत्कालीन कल्पनांमधल्या गॉगल्स- पांढरे कपडे आणि फोटो या प्रकारच्या स्वच्छता मोहिमेपर्यंत आणि ‘स्वच्छ-सुंदर शाळा’ योजनेत बक्षीस मिळवणाऱ्या (परंतु मुलींसाठी स्वच्छतागृहांची सोय नसणाऱ्या) शाळांपासून तर निर्मल भारत अभियानापर्यंत आजवर सहसा नावापुरत्या- फोटोपुरत्या- प्रोत्साहनापुरत्या स्वच्छता मोहिमा अंगवळणी पडल्या होत्या. आता मात्र पंतप्रधानांच्या पुढाकाराने आणि भरघोस गुंतवणुकीतून सुरू झालेल्या स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छतेविषयीची चर्चा गांभीर्याने करावी लागेल असे दिसते.

गांधींचेही तेच. स्वातंत्र्यानंतर लगोलग (दुर्दैवाने ते मिळताक्षणीच मृत्यू पावलेले) विनोबांच्या फसलेल्या भूदान मोहिमेतून परागंदा होत, गांधीवाद्यांच्या कर्मठ आचारसंहितेच्या कचाटय़ात न अडकण्याची आणि काँग्रेस राजवटीतल्या सरकारी तसबिरींच्या चौकटीत न सापडण्याची धडपड करणारे गांधी, कधी कधी दलितांच्या रागात आणि जनचळवळींच्या त्यांच्याविषयीच्या (भाबडय़ा) लोभात सापडत राहिले. पण मुख्यत: ते अवतरले ते रिचर्ड अ‍ॅटनबरोंसारख्या (परक्यांच्या!) ‘गांधी’मध्ये आणि (अस्सल मातीतल्या!) ‘मुन्नाभाई’मध्ये आणि तितक्याच अस्सल ‘गांधीबाबां’च्या आशीर्वादामध्ये! आता मात्र गांधींचे भाजपच्या नेतृत्वाखाली वैचारिक पुनरुत्थान होऊ घातले असल्याने त्यांच्याविषयीही पुन्हा एकदा गांभीर्याने बोलावे लागेल असे दिसते.

पहिल्या जगांमधल्या युरोप-अमेरिकादी देशांमध्ये काही काळ वास्तव्य करून आलेले आपले आप्तबांधव आणि भगिनी तिथल्या चकाचक रस्त्यांविषयी आणि नागरिकांच्या स्वच्छताविषयक सवयींविषयी बोलताना थकत नाहीत. काही सौंदर्यासक्त चित्रकारांना- कलाकारांना अस्वच्छता आणि कुरूपता म्हणजे सुंदर जीवनाला मिळालेला शाप वाटतो. तर दुसरीकडे (ते दिवसभर असह्य़ घाणीत काम करीत असल्यामुळे) सफाई कामगारांची, गरिबांची घरे कमालीची स्वच्छ, नीटनेटकी असतात असेही काहीसे अनुग्रहात्मक वर्णन नेहमी केले जाते. या सगळ्यांप्रमाणेच गांधींनाही स्वच्छता आवडत असे, परंतु ते सर्वच बारीकसारीक विषयांचा व्यवस्थात्मक विचार करीत असल्याने त्यांच्या स्वच्छतेच्या संकल्पनांनादेखील व्यवस्थात्मक चर्चेचे आयाम होते, असे म्हणावे लागेल.

गांधींबरोबर आणि गांधींवाचूनदेखील स्वच्छतेच्या प्रश्नाचा विचार करताना हे व्यवस्थात्मक आयाम विसरून चालणार नाही. भारतासारख्या गरीब देशांच्या तुलनेत जगातले पुढारलेले भांडवली देश पुष्कळसे स्वच्छ असतात. (अर्थात या देशांतील नागरिकांचे खाजगी जीवन आणि त्यांची घरे बहुधा पुष्कळ अस्वच्छ असतात याचाही अनुभव कित्येकांनी घेतला असेल.) परंतु या सार्वजनिक स्वच्छतेसाठी त्यांना अतोनात, अवाढव्य नागरी यंत्रणा उभारावी लागते आणि ती यंत्रणा सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातल्या भांडवली गुंतवणुकीवर चालत असते. थोडक्यात, भांडवली संपन्नतेच्या बरोबरीने देश हळूहळू स्वच्छ होत जातात. अन्यथा अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील गलिच्छ इंग्लंड-अमेरिकेची वर्णने कादंबऱ्या-चित्रपटांतून कित्येकांनी वाचली-पाहिली आहेतच.

उलटपक्षी प्रगत भांडवली देशांतल्या सार्वजनिक स्वच्छतेचा डोलारा अतोनात कचरानिर्मिती करणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या चौकटीतच उभा राहू शकतो ही बाबदेखील ध्यानात घेतली पाहिजे. गांधींचाच दाखला देऊन बोलायचे झाले तर भांडवली अर्थव्यवस्था ग्राहकवादी आणि म्हणून क्रयवादी वस्तूंच्या अवाढव्य खरेदी-विक्री व्यवहारांवर चालत असतात. या व्यवहारात गरज आणि हाव (सभ्य भाषेत हौस!) यांच्यातील सीमारेषा पुसट बनवण्याची खेळी बाजारपेठ सातत्याने खेळते आणि त्यातून अनावश्यक वस्तूंचा अफाट कचरा जगातील तथाकथित प्रगत देशांतील नागरिक सातत्याने तयार करीत असतात. नुसता खाण्यापिण्याच्या बाबींचा विचार केला तर जगातील वीस टक्के श्रीमंत ऐंशी टक्के खाद्यसामग्रीचा उपभोग घेत असतात-नासाडी करीत असतात असे आकडेवारी सांगते. या बेताने अन्य वस्तूंच्या उपयोगाचे-नासाडीचे गणित मांडले तर प्रगत देश करीत असणाऱ्या वस्तूंच्या नासाडीचे आणि त्यातून तयार होणाऱ्या कचरानिर्मितीचे सोपे कोष्टक मांडता येईल. आपल्याकडे घरातला कचरा बाहेर अंगणात लोटण्याची पद्धत होती. त्याच धर्तीवर प्रगत देशांमधल्या क्रय-विक्रयांतून निर्माण झालेला अवाढव्य आणि कित्येकदा घातक स्वरूपाचा कचरा फेकून देण्यासाठी आता त्यांना साऱ्या जगाचे अंगण आणि समुद्र अपुरे पडू लागले आहेत.

I HOPE THIS WILL HELP YOU....

Similar questions