hi guys pleaseeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee givee a birthday speech in marathi asap
Answers
is it helpful
प्रत्येक मनुष्य मग तो शिशु असो, प्रौढ असो कि वृद्ध असो, त्याचा आयुष्यात दरवर्षी एकदा वाढदिवस येतोच. आणि प्रत्येक व्यक्ती त्याचा जन्माचा दिवस नेहमी आठवणीत राहावा म्हणून आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा बेतात असतो. तो त्या दिवशी केक कापेल, नाचेल, पार्टी देईल असे अनेक आणि विविध उपक्रम राबवेल. आणि ते काहीअंशी आवश्यक सुद्धा आहे.
परंतु वाढदिवस साजरा करतांना हे सुद्धा लक्षात असू द्यावे कि, आपल्या आयुष्याचा एक वर्ष कमी सुद्धा झालेला आहे. आपण ह्या एक वर्षात आपल्या उद्देशप्राप्तीसाठी कोणते प्रयत्न किती प्रमाणात केलेत. आपण किती प्रमाणात यशस्वी झालो, आपल्या उणीवा काय, आपण आपल्या दोषावर मात करून समोर जाण्यास काय करायला पाहिजे होते, आपण आता काय करू शकतो. हे प्रश्न वारंवार किंबहुना वाढदिवसानिमित्त आपण स्वतःला विचारण्यास हवे. ह्याला आत्मचिंतन म्हणतात.
वाढदिवस हे फक्त मजा करण्याचा दिवस नसून स्वतःला जाणून घेण्याचा दिवस सुद्धा आहे. आपल्या संस्कृतीत वाढदिवसाला एक संस्कार म्हणून सुद्धा ओळखले जाते, त्या मागच्या हेतू सुद्धा हाच कि एवढा किमती आणि दुर्मिळ मनुष्य जीवन आपल्याला लाभला त्याचा आपण आत्मचिंतणाच्या माध्यमातून उत्कर्ष करावा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून आपला, समाजाचा आणि आपल्या मातृभूमीच्या उद्धार करावा.